राहुल गांधी लवकरच काँग्रेस अध्यक्षपदी: सोनिया गांधी
राहुल गांधी लवकरच काँग्रेस पक्षाची धूरा सांभाळणार असल्याचं स्वत: काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे.
नवी दिल्ली : राहुल गांधी लवकरच काँग्रेस पक्षाची धुरा सांभाळणार असल्याचं स्वत: काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे.
ANI न्यूज एजन्सीच्या मते, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी म्हटलं की, "राहुल गांधी लवकरच पक्षाचा पदभार सांभाळतील." गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी पक्षाच्या अध्यक्षपदी विराजमान होतील अशा बातम्या येत होत्या. अनेक राज्यांमधील काँग्रेस नेत्यांनी राहुल गांधींना अध्यक्ष बनवण्याची शिफारसही केली आहे.
दिवाळीनंतर राहुल गांधी यांची काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, गेल्या महिन्यात अमेरिका दौऱ्यात राहुल गांधी यांनीही काँग्रेस अध्यक्षपद सांभाळण्यास तयार असल्याचं म्हटलं होतं.
राहुल गांधी गुजरात दौऱ्यावर आहेत. जर दिवाळीनंतर राहुल गांधी यांची काँग्रेस अध्यक्षपदी निवड झाली तर, गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका म्हणजेच त्यांच्या नेत्रृत्वाची परीक्षा असणार आहे.
गुजरात विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी राहुल गांधी खूप प्रयत्न करत आहेत. तसेच राहुल गांधी यांना काँग्रेस अध्यक्ष बनविण्याची मागणीही गेल्या अनेक दिवसांपासून होत आहे.