नवी दिल्ली : राहुल गांधी हे लवकरच काँग्रेसच्या अध्यक्षपदी विराजमान होतील, असे संकेत काँग्रेसचे युवा नेते सचिन पायलट यांनी दिले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राहुल गांधी यांची काँग्रेस उपाध्यक्षपदावरून आता बढती होणे गरजेचं असल्याचं सचिन पायलट यांनी म्हटले आहे, त्यामुळे काँग्रेसमध्ये नवनवीन बदल दिसून येतील असं सांगण्यात येत आहे. 


राहुल गांधी हे दिवाळीनंतर काँग्रेस अध्यक्षपदी विराजमान होतील अशी चर्चा सध्या दिल्लीत आहे.  काँग्रेस अध्यक्षपदी राहुल गांधी यांची निवड व्हावी अशी अपेक्षा काँग्रेसमधील युवा नेत्यांच्या फळीला आहे.