अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणुकांचे वारे आतापासून जोरदार वाहू लागले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर आता कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी हे अहमदाबादमध्ये पोहोचले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खेडातील एका सभेला त्यांनी संबोधित केले. यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा विकासाचा मुद्दा उचलला आणि मोदींवर जोरदार टीका केली.  


यावेळी बोलताना त्यांनी लोकांना विचारले की, ‘गुजरातमध्ये विकासला काय झाले? खोटं ऎकून ऎकून विकास वेडा झाला आहे’. लोकांनीही त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला. त्याआधी रविवारी मोदींनी विकासाबाबत विचारल्या जात असलेल्या कॉंग्रेसच्या प्रश्नांना उत्तर दिले होते. 



ते पुढे म्हणाले की, ‘मोदीजींनी जर एखाद्या शेतक-याला किंवा किंवा लहान मुलाला नोटाबंदीबद्दल विचारले असते तर त्यांनी नकारच दिला असता. पण त्यांनी तसे केले नाही. मी गरिबांबाबत, कामगारांबाबत, शेतक-यांबाबत, आदिवास्यांबाबत बोलतो. पण सरकार हे १०-१५ उद्योगपतींसाठी काम करतं’.


‘देशात प्रत्येक २४ तासात ३० हजार लोकं बेरोजगार होत आहेत. बेरोजगारांची फौज उभी झाली आहे. तुम्ही ज्या वस्तू खरेदी करता त्यावर जास्तकरून मेड इन चायना लिहिलेलं असतं. चीनमध्ये एका दिवसात ५० लोकांना रोजगार मिळतो आणि भारतात केवळ ४५० लोकांना. अजूनही संपूर्ण देशात शेतकरी आत्महत्या करत आहेत’.