नवी दिल्ली : रेल्वे प्रवासी मोबाईल अॅपच्या मदतीने रेल्वे गाडी संदर्भातील तक्रार करु शकणार आहेत. या तक्रारीची तात्काळ नोंद केली जाणार असून आरपीएफदेखील यामध्ये तातडीने लक्ष घालणार असल्याची माहिती वरिष्ठ आरपीएफ अधिकाऱ्याने दिली. छेडछाड, चोरी, महिलांचा छळ अशा अनेक तक्रारी मोबाईल अॅपच्या मदतीने नोंदवता येणार आहे. याची पायलट परियोजना मध्य प्रदेशमध्ये सुरू असून लवकरच याला देशभरात लागू केलं जाणार आहे.


वेळ वाचणार 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तक्रार नोंदविण्यासाठी आता प्रवाशांना पुढचं स्थानंक येण्याची वाट पाहावी लागणार नाही.


ते आपल्या मोबाईलची मदत घेऊ शकतात आणि आरपीएफ तात्काळ त्यांच्यापर्यंत पोहोचेल.


कोणती घटना आपल्या शेजारी घडत असेल आणि आपल्या त्याबद्दल तक्रार द्यायची असल्यास तिकिटं निरिक्षकांनी दिलेला फॉर्म भरून द्यावा लागतो. त्यानंतर तो फॉर्म पुढच्या स्थानकात आरपीएफ किंवा जीआरपीकडे सुपूर्द केला जातो.


या सर्व घडामोडी होण्यात फार वेळ जातो. प्रवाशांना तात्काळ उपाययोजना मिळत नाहीत.


पण आता या नव्या अॅपमध्ये केवळ आरपीएफचं नाही तर रेल्वे पोलीस (जीआरपी) सहीत टीटीई आणि रेल्वे संवाहकदेखील असणार आहेत.


महिलांसाठी पॅनिक बटण 


या अॅपमध्ये महिलांसाठी पॅनिक बटण देखील असणार आहे. गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी गेल्यावर्षी 14 डिसेंबरला यासंदर्भातील प्रस्ताव दिला होता.


रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या समस्येचं निराकारण ऑनलाईन व्यवस्थेतून व्हावं असा त्या प्रस्तावामागचा हेतू होता. या अॅपवरून यात्री ऑफलाईन तक्रारही नोंद करु शकतात.