ट्रेनमधील ब्लँकेट किती दिवसांनी धुतात? स्वत: रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलं उत्तर, `एकदा...`
रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. आपण रेल्वेने प्रवास करताना रेल्वेच्या डब्यात आपल्याला चादर किंवा ब्लॅकेट दिलं जातं. मात्र हे ब्लँकेट किती दिवसातून धुतलं जातं हे समजल्यावर तुम्हाला धक्काच बसेल
रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. आपण रेल्वेने प्रवास करताना रेल्वेच्या डब्यात आपल्याला चादर किंवा ब्लॅकेट दिलं जातं. मात्र हे ब्लँकेट किती दिवसातून धुतलं जातं हे समजल्यावर तुम्हाला धक्काच बसेल. खुद्द रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनीच याबाबत लेखी उत्तर दिलंय. पाहुया रेल्वेतील डर्टी ब्लॅकेटसंदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट..
रेल्वे प्रवासात तुम्हाला पांघरण्यासाठी जे ब्लॅकेट दिलं जातं ते यावेळी नीट पाहा. हे उबदार ब्लँकेट डर्टी ब्लँकेट असण्याची शक्यता आहे. कारण रेल्वेत प्रवाशांना दिलं जाणारं ब्लँकेट महिन्यातून एकदाच धुतलं जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनीच लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे. त्याचं झालं असं की काँग्रेसचे गंगानगरचे खासदार कुलदीप इंदौरा यांनी रेल्वेतील साफसफाई आणि चादरी, ब्लँकेट धुतल्या जातात का? याबद्दल रेल्वे मंत्रीअश्विनी वैष्णव यांना प्रश्न विचारले होते. त्यावर रेल्वेमंत्र्यांनी हे उत्तरं दिलं Eus.
कुलदीप इंदौरा, खासदार काँग्रेस
प्रश्न - रेल्वेतील बेडिंगची मुलभूत स्वच्छता कशी केली जाते? रेल्वे महिन्यातून फक्त एकदाच ब्लँकेट धुतले जाते का?
अश्विनी वैष्णव, रेल्वे मंत्री
उत्तर - रेल्वे प्रवाशांना दिली जाणारी चादर, ब्लँकेट महिन्यातून कमीत कमी एकवेळा धुतले जातात. आणि चादरीला जोडण्यासाठी आणखी एक पांघरूण अतिरिक्त दिले जाते.
रेल्वे मंत्र्यांनी दिलेल्या उत्तरामुळे रेल्वे प्रवाशांच्या स्वच्छतेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. प्रत्येक प्रवाशाकडून तिकीटात स्वच्छतेसाठी पैसे आकारले जातात, मग प्रवाशांना दिले जाणारे ब्लँकेट महिन्यातून एकदाच का धुतले जातात? असा प्रश्न आता रेल्वे प्रवाशी करताना दिसत आहेत.
ब्लँकेट एसी डब्यांमध्ये दिले जातात. यासाठी प्रवाशांकडून तिकीटही तसंच आकारलं जातं. लाखो प्रवाशांचा आधार असलेल्या रेल्वेच्या जेवणाविषयी कधी तक्रारी असतात तर कधी स्वच्छता गृहातील स्वच्छतेबाबत. आता तर तब्बल 30 दिवसांनी ब्लँकेट धुत असल्याचं समोल आल्यानंतर तर रेल्वेप्रवाशांनी डोक्यावरच हात मारण्याची वेळ आली आहे.