Indian Railway Ticket Fare : दूरच्या प्रवासासाठी अनेकांची पहिली पसंती ही रेल्वेलाच (Indian Railway) असते. वेळेत पोहचण्याची हमी, सुरक्षित प्रवास आणि परवडणारे तिकीट दर यामुळे अनेक जण रेल्वेनेच प्रवास करतात. मात्र रेल्वे तिकीट दरवाढीची बातमी वाचून तुम्हाला झटका बसू शकतो. केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी बुधवारी लोकसभेत (Lok Sabha) बोलताना तिकीट दरवाढीचे संकेत दिले आहेत. रेल्वेमंत्र्यांच्या या संकेतानंतर येत्या काळात तिकीट दरवाढीची शक्यता व्यक्त केली जात आहे. लोकसभेत रेल्वेमंत्र्यांना कोविडआधी वरिष्ठ नागरिकांना रेल्वे प्रवासात मिळणारी सवलत पुन्हा सुरु करण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर सद्यपरिस्थितीत प्रत्येक प्रवाशाला 55 टक्के सवलत दिली जात असल्याचं वैष्णव म्हणाले. (railway minister ashwini vaishnaw on indian railways fare and subsidy for senior citizens in lok sabha winter session)


तब्बल 59 हजार कोटींचं अनुदान 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"प्रत्येक प्रवाशाच्या प्रवास भाड्यावर रेल्वे प्रति किमी 1 रुपये 16 पैसे खर्च होतात. तर रेल्वे यासाठी फक्त 45 ते 48 पैसे आकारते. प्रवासी भाड्यावर गेल्या वर्षात रेल्वेकडून 59 हजार कोटी रुपयांचं अनुदान देण्यात आलं आहे. रेल्वेकडून प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यात भर दिला जात आहे. नवी रेल्वे सेवा, रेल्वे मार्गाचं विस्तार अशा सेवांकडे भर दिला जात आहे. त्यामुळे प्रवाशांनीही रेल्वेच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करायला हवा", असं रेल्वे मंत्र्यांनी नमूद केलं. 


प्रवाशांसाठी भविष्यात अनेक सुविधा


"येत्या काळात प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी चांगल्या सुविधा देण्यात येणार आहेत. भाडेवाढीच्या संकेतासह भविष्यात आणखी काही निर्णय घेतली जातील", अशी पूर्वकल्पनाही रेल्वेमंत्र्यांनी दिली. "देशातील मोठ्या स्थानकांसह अन्य स्थानकांवरही विविध विकासकामं सुरु आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं रेल्वेबाबत मोठं व्हीजन आहे", असंही रेल्वेमंत्र्यांनी सांगितंल.