नवी दिल्ली : रेल्वेने अलीकडेच काही ट्रेनच्या नंबरमध्ये बदल केले आहेत. त्याचबरोबर प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेने काही ट्रेनच्या स्पीड ऐवजी तिकीट बुकिंग सुविधा काहीशी सोपी केली आहे. याच दरमान्य रेल्वेने देखील प्रवाशांसाठी काही दिलेल्या सुविधेत बदल केले आहेत. या सुविधेत प्रवासी मोफत प्रवास करू शकतात. रेल्वेने कॅशलेस तिकिटिंगला प्रोत्साहन देण्यासाठी नवीन योजना सुरु केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या योजनेअंतर्गत तुम्ही 'भीम अॅप' मधून तिकीट बुक करू शकता. त्यामुळे तुम्हाला फ्री मध्ये प्रवास करण्याची संधी मिळेल. कॅशलेस तिकिटिंगला प्रोत्साहन देण्यासाठी भोपाळ रेल्वेने  'भीम' च्या माध्यमातून तिकीट बुक करणाऱ्यांसाठी पुरस्कार योजना सुरु केली आहे. मात्र त्यासाठी तुम्हाला तिकीट  'भीम अॅप' मधूनच बुक करावे लागेल.


काय आहे ही योजना :


भोपाळ रेल्वेच्या या योजनेमुळे 'भीम अॅप' मधून तिकीट बुक केल्यास तुम्हाला फायदा होऊ शकतो. याचा लकी ड्रॉ नोव्हेंबरमध्ये काढण्यात येईल. यात भीम अॅपमधून तिकीट बुक करणाऱ्या पाचजणांना लॉटरीच्या माध्यमातून फायदा मिळेल. लकी ड्रॉ मध्ये येणाऱ्या पाचजणांना रेल्वेतून आवडत्या ठिकाणी फ्री मध्ये प्रवास करण्याची संधी मिळेल.


महत्त्वाचे :


तुम्ही जर तुमच्या परिवारासह एसी कोचमधून प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी हे महत्त्वाचे एसी कोचमध्ये प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाचे आयडी चेक केले जाईल. यापूर्वी फक्त एकाच व्यक्तीचे आयडी चेक केले जात होते. मात्र आता असे होणार नाही. प्रत्येक व्यक्तीला आपले आयडी दाखवावे लागेल. नोव्हेंबरनंतर या नियम लागू केला जाईल.