मुंबई : सरकारने ज्येष्ठ  नागरिकांनादेखिल सबसिडी सोडण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला ज्येष्ठ  नागरिकांनीदेखील सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'सब्सिडी  छोडो' या योजने अंतर्गत सुमारे नऊ लाख लोकांनी सबसिडी सोडली आहे. यामुळे रेल्वेची सुमारे ४० करोड रूपयांची बचत झाली आहे. 


दोन पर्याय - 


ज्येष्ठ  नागरिक त्यांच्या तिकीटांच्या सूटीचा वापर करू शकतात किंवा ती पूर्णपणे सोडू शकतात. यंदाच्या वर्षीपासून सबसिडीतील सुमारे ५० % रक्कम सोडण्याचाही पर्याय देण्यात आला आहे.  


योजनेमागील कारण काय ? 


ज्येष्ठ  नागरिकांना देण्यात आलेल्या सुटेतून रेल्वेवर  १३०० कोटी रूपयांचा बोजा येणार आहे. हा भार हलका करण्यासाठी 'सबसिडी छोडो' योजना आखली होती. 


महिला सर्वाधिक - 


२२ जुलै ते २२ ऑक्टोबर या दरम्यान सुमारे २.१६ लाख पुरूष तर २.६७ लाख महिलांनी पूर्ण सबसिडी सोडली आहे. तर २.५१  लाख पुरूष आणि  २.०५ महिलांनी ५० % सबसिडी सोडली आहे. एकुण तीन महिन्यात तब्बल ९.३९ लाख ज्येष्ठ  नागरिकांनी आपली सबसिडी सोडली  आहे.  


संख्या दुपट्टीने वाढली  


रेल्वे मंत्रालयाच्या अधिकार्‍यांच्या माहितीनुसार, एका वर्षात सबसिडी सोडण्याचे प्रमाण दुप्पट झाले आहे. यामुळे भविष्यात रेल्वेला होणारे नुकसान कमी होण्यास मदत होणार आहे.