Weather forecast Updates  : शेतकरी आणि सर्वसामान्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि चिंतेत टाकणारी बातमी. (Rain forecast and Drought) देशात यावर्षी अस्मानी संकटाचा इशारा देण्यात आला आहे. (Weather Updates) यावर्षी देशात दुष्काळ (Drought ) पडेल अशी शक्यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. मान्सूनवर हंगामी प्रभाव असल्याने 'अल निनो'चा (El Nino) धोका असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे सरासरीपेक्षा यंदा खूपच कमी पाऊस (Rain ) पडण्याची शक्यता आहे. यामुळे देशाला दुष्काळाचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे महागाईत आणखी भर पडण्याची शक्यता आहे. 


कमी उत्पन्नामुळे महागाई वाढीची भिती


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कमी उत्पन्नामुळे महागाई वाढेल असा यंदाच्या मान्सूनचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पॅसिफिक महासागराचा पृष्ठभाग गरम झाल्यावर 'अल निनो' हा करंट तयार होतो. त्याचा परिणाम नैऋत्य मोसमी वाऱ्यांवर होतो. मे-जूनच्या दरम्यान अल निनोचा प्रभाव पाहायला मिळेल. या कालावधीमध्ये ऊन आणि पावसाळा असे दोन्हीही ऋतू एकत्र असतील.


दुष्काळाचं संकट लक्षात घेऊन आवश्यक त्या उपाययोजना...


जगातल्या विविध संस्थांनी दिलेल्या या इशा-याची सरकारनेही गांभीर्याने दखल घेतली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत याची माहिती दिली. दुष्काळाचं संकट लक्षात घेऊन आवश्यक त्या उपाययोजना करण्याची तयारी सरकारने सुरु केलीय. आगामी काळात देशात लक्षणीय दुष्काळी परिस्थिती येऊ शकते. याआधी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा, झारखंड, पंजाब, तामिळनाडू, उत्तराखंड आणि देशाच्या पूर्व भागात अलिकडच्या वर्षांत मध्यम ते गंभीर दुष्काळ पडला आहे. तसेच महाराष्ट्रातही ओला आणि सुका दुष्काळाचा सामना करावा लागला आहे. पुन्हा एकदा दुष्काळाचे संकट ओढवू शकते. कारण यावर्षी पावसाचे प्रमाण हे तुलनेत कमी असणार आहे. त्यामुळे दुष्काळीची भिती व्यक्त होत आहे.


पारा वाढतोय, घराबाहेर बाहेर पडताना सावधान !


कोकण आणि मुंबईत बाहेर फिरताना सावधान. कारण पुढचे दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. मुंबई आणि कोकणातही तापमान 39 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. तेव्हा उष्णतेच्या लाटेपासून वाचण्यासाठी घराबाहेर पडताना आवश्यक ती काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आले आहे.


दुसरीकडे विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रावर मात्र अवकाळीचे ढग आहेत. उत्तर महाराष्ट्रावर येत्या सोमवारपासून अवकाळी पावसाचं सावट राहणार आहे. तेव्हा शेतकऱ्यांनी पिकांची निगा राखावी, असं आवाहन करण्यात आले आहे.