Man Divorce Wife Because Of Skin Disease: लग्नानंतर एका महिन्याच्या आतच पती नवविवाहित पत्नीला तिच्या माहेरी सोडून आला. त्यानंतर 2 महिन्यांनी त्याने फोनवरुन पत्नीला तलाक, तलाक, तलाक (Talaq) म्हणत ट्रीपल तलाक (Triple Talaq) दिला. या प्रकरणामध्ये पत्नीला घटस्फोट (Divorce) देण्याचं कारण फारच विचित्र असल्याची माहिती समोर आली आहे. एका हिंदी वेबसाईटला या पीडित महिलेने दिलेल्या माहितीनुसार तिची त्वचा कोरडी राहते म्हणून नवऱ्याने तिला घटस्फोट दिला आहे. आपल्याला त्वचेचा आजार असून त्यामुळे त्वचा कोरडी राहते असंही या महिलेने सांगितलं आहे. 


एका महिन्यात तिला माहेरी सोडून आला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पीडित महिला ही घरामध्ये कमावणारी एकमेव व्यक्ती आहे. त्यामुळे आता माहेरच्या सर्व कुटुंबाची जबाबदारी या महिलेवर आली आहे. हा संपूर्ण प्रकार छत्तीसगडमधील मनेंद्रगढ येथील वॉर्ड क्रमांक 20 मानी मोहल्ला येथील आहे. येथील नसीमा बानोचा निकाह रायपूरमधील रहिवाशी असलेल्या मोहम्मद शमीमबरोबर झाला होता. लग्नाच्या एका महिन्याच्या आताच शमीमने नसीमाला तिच्या माहेरी सोडलं. तुमच्या मुलीला त्वेचाचा आजार आहे असं शमीम नसीमाच्या आई-वडिलांना सांगून आला. मुलीवर इलाज करा आणि त्यानंतर तिला परत पाठवा असंही शमीमने नसीमाच्या कुटुंबियांना सांगितलं. नेमकं काय करावं हे नसीमाच्या कुटुंबियांना समजत नव्हतं. अकेर नसीमा पती पुन्हा तिला सासरी घेऊन जाण्यासाठी येईल या अपेक्षेने माहेरीच राहत होती.


दोन महिन्यांनी फोन केला अन्...


मात्र शमीमने पत्नीला माहेरी नेऊन सोडल्यानंतर 2 महिन्यांनी तिला फोन केला. त्यानंतर नसीमने त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. दोघांमध्ये फोनवरच थोडी बाचाबाची झाली. अखेर शमीमने फोनवरुनच 3 वेळा तलाक म्हणत नसीमला घटस्फोट दिला. यानंतर नसीमने शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपी पतीला त्याच्या रायपूरमधील राहत्या घरातून अटक केली आहे. पोलिसांनी शमीमला कोर्टासमोर हजर केलं. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने शमीमला जामीन मंजूर केला आहे.


असं कोणाबरोबरही होऊ नये...


नसीमने आता आपल्याला या प्रकरणामध्ये न्याय हवा आहे अशी मागणी केली आहे. माझ्याबरोबर जे झालं ते इतर कोणत्याही महिलेबरोबर होऊ नये, असं नसीमचं म्हणणं आहे. तसेच आर्थिक स्थिती बेताची असल्याने शमीमने आपल्याला पोटगी किंवा आर्थिक मदत करावी अशीही नसीमची मागणी आहे. सध्या नसीम आपल्या आई-वडिलांच्या घरीच राहते.