मथूरा : Loudspeaker Ban:: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील लाऊडस्पीकर हटवण्याची मागणी केल्याचा मुद्दा उत्तर प्रदेशातही गाजू लागला आहे. मथुरा, उत्तर प्रदेश येथे हिंदू संघटनांनी मशिदींवरील लाऊडस्पीकर काढण्याचा किंवा आवाज कमी करण्याची मागणी केली आहे. मथुरेत राहणाऱ्या लोकांचे म्हणणे आहे की, लाऊडस्पीकरमुळे होणाऱ्या अजानमुळे ते त्रस्त आहेत. दरम्यान, लाऊडस्पीकरने हनुमान चालिसा सुरू करण्याचा इशारा देण्यात आला आहे.


हिंदू संघटनांचा इशारा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मशिदीतून येणार्‍या आवाजामुळे ते त्रस्त झाल्याचे हिंदुत्ववादी संघटनांचे म्हणणे आहे. हा आवाज थांबवला नाही, तर ठिकठिकाणी लाऊडस्पीकर लावून हनुमान चालीसा पठण केले जाईल.


कासगंजमध्ये हनुमान चालिसा पठण सुरू 


यूपीच्या अनेक शहरांमध्ये लाऊडस्पीकवर अजानला आक्षेप घेण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातील कासगंजमधील पटियाली शहरात भोंगे लावून होणाऱ्या अजानच्या निषेधात हनुमान चालीसाला सुरुवात झाली आहे. मशिदीसमोरील मंदिरात लाऊडस्पीकरवरून हनुमान चालिसाचे पठण सुरू करण्यात आले आहे.


मंदिरांवरही लाऊडस्पीकर लावणार 


हिंदुत्ववादी नेते नितीन चतुर्वेदी म्हणतात की, आम्ही अनेकदा अजानच्या लाऊडस्पीकरला विरोध केला आणि लाऊडस्पीकर हळू वाजवायला सांगितले पण त्यांनी ऐकले नाही. मग आम्ही ठरवले की आम्ही मंदिरांवरही भोंगे लावून हनुमान चालिसा मोठ्या आवाजात वाजवावी. त्यानंतर हिंदुत्ववादी नेत्यांनी मिळून दोन मंदिरांमध्ये लाऊडस्पीकर लावले आणि हनुमान चालिसा सुरू केली. येत्या काही दिवसांत पटियालीतील सर्व मंदिरांमध्ये लाऊडस्पीकर लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे.


बहराइचमध्ये केंद्रीय मंत्री संजीव बालियान यांनी म्हटले की, न्यायालयाने ध्वनिप्रदूषणाचे डेसिबल प्रमाण आधीच निश्चित केले आहे. आपण सर्वांनी कायद्याचे पालन केले पाहिजे. मंदिर असो की मशीद, तिथं ध्वनी प्रदूषण होता कामा नये.