राजस्थान : राजस्थानमधल्या राजसमंद जिल्ह्यातील परावल गावात राहणाऱ्या ४ वर्षांच्या किंजलची सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे. याला कारणही तसंच आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर्षभरापूर्वी किंजल बोलायला लागली आणि आपलं नाव उषा असल्याचं सांगू लागली. सुरूवातीला घरच्यांनी तिच्याकडे दुर्लक्ष केलं. मात्र राजसमंद जिल्ह्यातल्याच पिपलांत्री गावात आपलं घर असल्याचं किंजल सांगू लागली. भावाला भेटायचंय, असा हट्टही तिनं धरला. आपण भाजलो होतो आणि अँब्युलन्समधून आपल्याला थेट इथं आणलं असं किंजल सांगायची. 


डॉक्टरांनी तिला तपासलं आणि काही झालं नसल्याचं सांगितलं. किंजल मात्र आपली आई आणि घर पिपलांत्रीमध्येच असल्याचं सारखं सांगत होती. ही बातमी पसरली आणि पिपलांत्रीमधला पंकज किंजलला भेटायला आला. धक्कादायक म्हणजे किंजलनं दिवंगत उषाच्या भावाला अचुक ओळलं.  यानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. नंतर किंजलला पिपलांत्रीला नेलं गेलं. कधीही गावाबाहेर न गेलेली किंजल पिपलांत्रीबद्दल सगळं व्यवस्थित सांगत होती. 


उषाच्या घरातला तिचा वावर सहज होताच पण घरातील सर्वांना तिनं बरोबर ओळखलं. झालं असं होतं की काही वर्षांपूर्वी पिपलांत्रीमधील उषा नावाच्या महिलेचा स्वयंपाकघरात काम करताना भाजली होती. त्यातच तिचा मृत्यू झाला होता. या सगळ्या आठवणी किंजल अचुक सांगत असल्याचा तिच्या पालकांचा आणि उषाच्या घरच्यांचा दावा आहे.  



ज्योतिषांनीही पुनर्जन्माच्या गोष्टीला पुराणांचा आधार असल्याचा दावा केलाय. तर अंधश्रद्धा निर्मुलन समितीनं यात काही तत्थ्य नसल्याचं म्हटलंय. 


या घटनेमुळे किंजल आणि उषा यांच्या कुटुंबीयांमध्ये जिव्हाळा निर्माण झालाय, हे मात्र खरं.  किंजल परावलमध्ये राहते, मात्र पिपलांत्रीमधील उषाच्या कुटुंबीयांशीही तिचा संवाद असतो. असं असलं तरी पुनर्जन्माला कोणताही वैज्ञानिक आधार नसल्यानं किंजलची ही कहाणी नेमकी काय आहे, यातलं सत्य-असत्य काय हे शोधणं गरजेचं आहे.