जात काही जात नाही! माठातलं पाणी प्यायला, शिक्षकाने दलित विद्यार्थ्याला लाथा-बुक्क्यांनी मारलं
rajastan minoritie student allegedly beaten by teacher in barner for drinking water from pot
Atrocities on Dalits: आज एकविसव्या शतकातही जातीवाद संपलेला नाही. अस्पृश्यता आणि जाति-आधारित भेदभाव भारतात अजूनही अस्तित्वात आहेत का? असा प्रश्न पडतो. याला कारण आहे राजस्थानमध्ये (Rajasthan) घडलेली एक संतापजनक घटना. शाळेत ठेवण्यात आलेला मडक्यातलं पाणी प्यायला म्हणून एका दलित विद्यार्थ्याला (Minorities) शिक्षकाने अक्षरश: लाथा-बुक्क्यांनी तुडवलं. इतकंच नाही तर त्या विद्यार्थ्याला जातीवाचक शब्दांचा वापर करत अपमानित केलं. ही घटना बाडमेर (Barner) जिल्ह्यातील चौहटन इथली आहे. याप्रकरणी विद्यार्थ्यांच्या तक्रारीनंतर आरोपी शिक्षकाविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली असून तपास सुरु करण्यात आला आहे.
वडिलांनी केली तक्रार दाखल
चौहटन इथल्या उच्च माध्यमिक विद्यालयात हा प्रकार घडला. घडलेला प्रकार विद्यार्थ्याने आपल्या वडिलांना सांगितला. त्यानंतर वडिलांनी यासंदर्भात पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. हा विद्यार्थी शाळेतील मडक्यातलं पाणी प्यायला. या गोष्टीचा राग येऊन शिक्षक डूंगरा राम यांनी त्या विद्यार्थ्याला जाब विचारला. जातिवाचक शब्दांचा वापर करत त्याला लाथा-बुक्क्यांन मारहाण केली. मारहाणीमुळे विद्यार्थी प्रचंड घाबरला, दुसऱ्या एका विद्यार्थ्याने त्याला घरी नेलं. मुलाची अवस्था पाहून वडिलांनी त्याला कारण विचारलं. यावर मुलाने शाळे घडलेलीस सर्व घटना वडिलांना सांगितली.
SC-ST एक्ट अंतर्गत तक्रार दाखल
याप्रकरणी पोलिसांनी एससी-एसटी अॅक्टअंतर्गत तक्रार दाखल करुन घेतली असून अधिक तपास सुरु केला आहे. दरम्यान, शिक्षक डूंगरा राम यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. हा विद्यार्थी स्कूलच्या प्रार्थना सभेत उशीरा आला. त्याला आपण केवळ लाईनमध्ये उभं राहण्यास सांगितल. याशिवाय कोणतंही बोलणं झालं नाही, असा दावा शिक्षकाने केलाय. गावातील काही लोकांनी राजकीय द्वेषापोटी आपल्या बदनामीचा कट रचल्याचा आरोप या शिक्षकाने केला आहे. मारहाण झाली आही की नाही यासाठी विद्यार्थ्याची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे.
राजस्थानमधली दुसरी घटना
राजस्थानमधील ही पहिला घटना नाहीए, याआधीही राजस्थानातील जालोरमध्ये एका दलित विद्यार्थ्याचा शिक्षकाच्या मारहाणीत मृत्यू झाला होता. तिसरीच्या वर्गात शिकणाऱ्या नऊ वर्षाच्या मुलाला माठातून पाणी घेतल्याने शाळेचे संचालकांनी मारहाण केली होती. त्या मुलाला जातीवाचक शब्द वापरून अपमानित करण्यात आलं. मारहाणीत मुलाच्या उजव्या कानामध्ये आणि डोळ्यांमध्ये इजा झाली. विद्यार्थ्याच्या कानाची नस फुटल्यानं विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी शिक्षका विरुद्ध खुनाचा आणि एससीएसटीचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.