मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या बैठकीला 107 आमदारांची उपस्थिती
राजस्थानमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी
जयपूर : मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या निवासस्थानी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक सुरू आहे. सभेला जवळपास 107 आमदार पोहोचले आहेत. उपमुख्यमंत्री सचिन पायलट अद्याप बैठकीला पोहोचलेले नाहीत. सचिन पायलट यांचं मन वळवण्याचे प्रयत्न काँग्रेस नेत्यांकडून सुरु आहेत.
अपडेट
काँग्रेस विधिमंडळाच्या बैठकीला एकूण 107 आमदार उपस्थित असल्याची माहिती पुढे आली आहे.
2.00 PM - काँग्रेस महासचिव वेणुगोपाल यांनी म्हटलं की, सचिन पायलट यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुरु आहे.
- काँग्रेस आमदारांच्या बैठकीला 10 पायलट समर्थक आमदार देखील पोहोचले आहेत.
- राजस्थान काँग्रेसच्या कार्यालयात सचिन पायलट यांचे काढून टाकलेले पोस्टर पुन्हा लावण्यात आले आहेत.
11.00 PM - महेश जोशी म्हणाले की, विधिमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी दिलेला व्हीप चुकीचा असल्याचं म्हणणारेच चुकीचे आहेत. व्हिपला आव्हान देणारे प्रकरण हे कायदेशीर कार्यक्षेत्राखाली येते. पक्ष नेतृत्वाच्या निर्देशानुसार बैठकीसाठी व्हिप जारी करण्यात आला आहे.
10.30 PM - काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांना येण्यास उशीर होत असल्याने बैठक उशीरा सुरु होत आहे. वेणुगोपाल चार्टर विमानाने त्रिवेंद्रमहून जयपूरला येत आहेत. रामलाल मीणा आणि गोपाळ मीणा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत.
10.20 PM - बसपामधून काँग्रेसमध्ये आलेले पाच आमदार मुख्यमंत्री निवासस्थानी पोहोचले आहेत. रफीक खान बसपाच्या आमदारांसह दाखल झाले. सर्व आमदार एकाच गाडीतून दाखल झाले.
10.18 PM - गुरमीतसिंग कुन्नर सुखराम बिश्नोई, किसन राम विश्नोई पद्माराम, हकम अली आणि शकुंतला रावत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत.
- सचिन पायलट यांच्यासोबत काँग्रेसचे अनेक आमदार आहेत. जयपूरमध्ये विधिमंडळ पक्षाची बैठक असूनही अनेक आमदार राज्याच्या बाहेर आहेत.
राजस्थानमधील राजकीय पेचप्रसंगावर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष ओम माथूर म्हणाले की, "राजस्थानातील लोकांनी काँग्रेसला राज्यात सरकार स्थापन करण्याची संधी दिली. त्यांनी त्यांचा योग्यप्रकारे वापर करायला हवा होता. मुख्यमंत्र्यांनी आपले सरकार कायम ठेवले पाहिजे होते, परंतु ते तसे करण्यास सक्षम नाहीत. त्याच्या पक्षाचे आमदार त्यांच्यावर नाराज आहेत.'