`तू साडीत छान दिसतेस, माझ्यासोबत...`; महिला शिक्षिकेसोबत मुख्याध्यापकाचे किळसवाणं कृत्य
महिला शिक्षिकेने मुख्याध्यापकाविरोधात याबाबत अधिकाऱ्यांकडे तक्रार केलीय
राजस्थानमधील (Rajasthan) भरतपूर (Bharatpur) जिल्ह्यात एका महिला शिक्षिकेने मुख्याध्यापकावर गैरवर्तन केल्याचा आरोपकेला आहे (Woman teacher molested school principal accused). मुख्याध्यापक अनेकदा तिच्याशी गैरवर्तन (misbehaviour) करतात, असे महिला शिक्षिकेचे म्हणणे आहे. भरतपूर जिल्ह्यातील हे दुसरे प्रकरण आहे. याआधीही एका शिक्षिकेने (teacher) मुख्याध्यापकांवर (Principal) आरोप केले होते. दोन महिन्यांपूर्वी कुम्हेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात असलेल्या सरकारी शाळेत शिक्षकेने (School) शाळेच्या मुख्याध्यापकावर बलात्काराचा (Rape) प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आता पुन्हा असाच काहीसा प्रकार घडला आहे.
रुपवास (Rupwas town) येथील राजकीय उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षिकेने मुख्याध्यापकावर गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे. शिक्षिकेने लेखी तक्रार केल्यानंतर उपविभागीय दंडाधिकारी राजीव शर्मा यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पाच सदस्यीस समित गठित केली आहे.
महिला शिक्षिकेने सांगितले की, "22 सप्टेंबर रोजी सकाळी शाळेत आल्यानंतर रजिस्टरमध्ये नोंद करत होती. त्याचवेळी तिथे मुख्याध्यापक आले. इतर शिक्षकही त्यावेळी उपस्थित होते. त्यावेळी मुख्याध्यापक अमर दयाल शर्मा यांनी मला म्हटलं की, माझ्या जवळ या मला तुमच्यासोबत माझ्या मोबाईलमध्ये फोटो काढायचा आहे. कारण साडीमध्ये तुम्ही खूप सुंदर दिसत आहात. तुम्ही तीन दिवसांपासून साडी घालून येत आहात आणि खूप सुंदर दिसत आहात."
मी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी मला धमकावले. त्यानंतरही त्यांनी शाळेत जबरदस्तीने माझ्यासोबत फोटो (Photo) काढून व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये (WhatsApp group) टाकला. ते माझ्याकडे चुकीच्या नजरेने पाहतात. मुख्याध्यापकांच्या या कृत्याने मी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाली आहे, असेही या शिक्षिकेने म्हटले.
शिक्षिकेच्या तक्रारीनंतर रुपवास दंडाधिकारी राजीव शर्मा यांनी माध्यमांना सांगितले की, "सरकारी शाळांतील शिक्षकांसोबत शारीरिक छळाच्या अनेक घटना जिल्ह्यात समोर आल्या आहेत. शाळेत मुलांना शिकवणारे शिक्षकच असे काम करत असतील तर मुलांवर काय परिणाम होईल. सरकारी शाळेतील शिक्षकानेही मुख्याध्यापकांविरोधात तक्रार दिली आहे. याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांना चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत."
न्यायदंडाधिकारी राजीव शर्मा यांनीही प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. यामध्ये महिला सदस्यांनाही ठेवण्यात येणार आहे. ही समिती या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणार आहे.