राजस्थान पोटनिवडणूक : भाजपला `दे धक्का`, तिन्ही जागांवर काँग्रेसची बाजी
राजस्थानमधील अलवर, अजमेर लोकसभा आणि मांडलगढ विधानसभेच्या पोट निवडणुकीत काँग्रेसने भाजपला जोरदार दे धक्का दिलाय. लोकसभेच्या दोन आणि विधान सभेची एक जागा काँग्रेसने जिंकली.
जयपूर : राजस्थानमधील अलवर, अजमेर लोकसभा आणि मांडलगढ विधानसभेच्या पोट निवडणुकीत काँग्रेसने भाजपला जोरदार दे धक्का दिलाय. लोकसभेच्या दोन आणि विधान सभेची एक जागा काँग्रेसने जिंकली.
भाजपच्या सत्तेला हादरा
सकाळी मतमोजणी सुरु झाली तेव्हाच काँग्रेसने आघाडी घेतली होती. अजमेर आणि अलवर लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने आघाडी घेतली होती. तर मांडलगढ विधानसभा निवडणुकीत भाजपने काँग्रेसला मागे टाकले होते. मात्र, तेथेही काँग्रेसने बाजी मारली आहे. दरम्यान, राज्यस्थानमध्ये भाजपची निर्विवाद सत्ता आहे. त्यामुळे भाजपचा हा पराभव म्हणजे जोरदार धक्का आहे.
भाजपच्या गोठात चिंता
भाजप खासदार प्रा. सांवर लाल जाट (अजमेर), खासदार चांद नाथ योगी (अलवर) आणि आमदार कीर्ति कुमारी (मांडलगढ) यांच्या निधनानंतर या तीन ठिकाणी पोट निवडणूक झाली. आज मतमोजणी सुरु झाली. राज्यस्थानमधील लोकसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने आघाडी घेतली होती. त्यामुळे भाजपच्या गोठात चिंता होती. तर दुसरीकडे काँग्रेसने आधीच विजयाचा दावा केला होता. तो त्यांनी निवडणूक जिंकून खरा केलाय.
काँग्रेसचे हे उमेदवार विजयी
अलवर लोकसभा मतदार संघातून भाजपचे जवंसत सिंग यादव विरुद्ध काँग्रेसचे डॉ. करण सिंग यादव (४० हजार मतांनी) तर अजमेर लोकसभा मतदार संघातून काँग्रेसचे रघु शर्मा विरुद्ध भाजपचे रामस्वरुप लांबा अशी लढत झाली. २०,६४८ मतांनी रघु शर्मा विजयी झालेत. तर मांडलगढ विधानसभा निवडणुकीत भाजपचे शक्ति सिंग हाडा विरुद्ध काँग्रेसचे विवेक धाकड यांच्यात लढत झाली.
विधानसभेत भाजपला दणका
अलवर लोकसभा मतदार संघातून काँग्रेसचे डॉ. करण सिंग यादव तर जमेर लोकसभा मतदार संघातून काँग्रेसचे रधु शर्मा आणि मांडलगढ विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे विवेक धाकड विजयी (१२,९७४ मतांनी ) झालेत. त्यामुळे एकहाती सत्ता असणाऱ्या राजस्थानमध्ये मुख्यमंत्री वसुंदरा राजे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, अध्यक्ष अमित शाह यांना जोरदार धक्का देण्यात काँग्रेस यशस्वी झालेय.