जयूपर : राजस्थानच्या दोन लोकसभा आणि एक विधानसभेच्या जागांसाठी निवडणूका झाल्या. त्यात कॉग्रेस विजयी झाले. यात पंजायती राज संस्थानं आणि स्थानिक निकाय उप निवडणूकांमध्ये कॉंग्रेसने ६ जिल्हा परिषदेच्या ४ जागांवर, पंजायत समितीच्या २० पैकी १२ जागांवर आणि स्थानीक संस्थेच्या ६ पैकी ४ जागांवर विजय मिळवला.


कॉग्रेंसचा मोठा विजय


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सत्ताधारी भाजपने जिल्हा परिषदेच्या केवळ एका जागेवर, पंजायत समितीच्या आठ जागांवर आणि स्थानिक संस्थेच्या दोन जागांवर विजय मिळवला. जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या एक-एक जागेवर निर्दलीन उमेदवारांनी विजय मिळवला.


 सचिन पायलट यांनी आनंद व्यक्त केला


राजस्थान प्रदेश कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष सचिन पायलट यांनी सांगितले की, नगर निकाय, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उपनिवडणूकांमध्ये कॉग्रेंसने विजयावर आनंद व्यक्त केला. ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी विधानसभा आणि लोकसभेच्या उपनिवडणूकीत वॅकअप कॉल करुन स्वतःला सिद्ध करेल की चार वर्ष सरकार झोपले होते आणि जनतेची दिशाभूल करत होते.