पुन:श्च हादरा...! काँग्रेसच्या 90 हून अधिक आमदारांचा राजीनामा
Congress : राजकीय पटलावर आणखी एक नाट्य रंगलं, वळल्या देशाच्या नजरा...
Rajasthan Congress news : (National Politics) देशाच्या राजकीय पटलावर सध्या अनेक अशा घडामोडी घडत आहेत, जे पाहता आता पुढे काय....? असाच प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे. सध्याच्या घडीला हे वातावरण राजस्थानमध्ये पाहायला मिळत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार एकिकडे मुख्यमंत्री अशोक गहलोत काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत. परिणामी राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाची सर्व सूत्र सचिन पायलट (sachin pilot) यांच्या हाती सोपवण्याचा विचार पक्षश्रेष्ठी करत आहेत. (rajasthan Congress stress over MLAs resignation ashok gehlot sachin pilot)
हा निर्णय सर्वांनाच रुचला असं नाही, कारण सध्याच्या घडीला काँग्रेसला (Congress) खिंडार पडलं असून, जवळपास 82 हून अधिक आमदारांनी विधानसभा अध्यक्ष सी. पी. जोशी यांच्याकडे आपले राजीनामे दिले आहेत. मंत्री प्रताप सिंह यांनी केलेल्या दाव्यानुसार 92 आमदारांना रातीनाम्यांवर स्वाक्षरी केली आहे.
अधिक वाचा : भाजप आमदाराला खंडणीचा मेसेज; दिली अशी धमकी
रविवारी गहलोत यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीला काँग्रेसचे अवघे 25 आमदार हजर राहिले होते. या बैठकीसाठी मल्लिकार्जुन खरगे, अजय माकन आणि खुद्द पायलटही उपस्थित होते. मुद्दा असा, की हा तोच क्षण होता जेव्हा काँग्रेसमध्ये असणारी नाराजी स्पष्टपणे समोर आली होती.
19 ऑक्टोबरपर्यंत बैठक नाही...
अशोक गहलोत यांच्या समर्थनात असणाऱ्या आमदारांनी पक्षश्रेष्ठींकडे 19 ऑक्टोबरपर्यंत आमदारांची बैठक न घेण्याची मागणी केली आहे. ही बैठक काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवणूक निकालानंतरच व्हावी अशी मागणी सध्या जोर धरत आहे. येत्या काळात आमदार दिल्लीत सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांचीही भेट घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे.