Crime News : राजस्थानमधील (Rajasthan Crime) जालोर येथून हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. राजस्थानच्या जालोर जिल्ह्यातील एका गावात बुधवारी एका 50 वर्षीय व्यक्तीने 23 वर्षीय तरुणाचा निर्घृणपणे खून केला आहे. 50 वर्षीय आजोबाने आपल्या नातवाच्या थोबाडीत मारल्याचा संतापजनक बदला घेतला आहे. वृद्धाने कुऱ्हाडीने वार करून तरुणाचे शीर धडावेगळे केले. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने मृतदेहाचे मुंडके हाताने उचलून 150 फूट दूर फेकून दिले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तरुणाची हत्या केल्यानंतर आरोपीने दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या पोलीस (Rajasthan Police) ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. अहोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पडर्डी गावात बुधवारी संध्याकाळी ही घटना घडली. पोलिसांनी याप्रकरणात संकला राम भील नावाच्या आरोपीला ताब्यात घेतले आणि  चौकशीनंतर गुरुवारी त्याला अटक केली. वैयक्तिक वादातून ही हत्या झाल्याचे पोलिसांनी सांगितले. मुलाच्या हत्येनंतर त्याच्या कुटुंबियांनी आंदोलन सुरु केल्याने संपूर्ण जिल्ह्यातील इंटरनेट सेवा 24 तासांसाठी बंद करण्यात आली होती. प्रशासनाने काही अटी मान्य केल्यानंतर कुटुंबियांनी मृतदेहावर अंतिम संस्कार केले.


जालोर जिल्ह्यातील एका गावात राहणारा किशोर सिंह भोमिया राजपूत याची संकला राम भील याने कुऱ्हाडीने वार करुन हत्या केली. आरोपीने खूनाच्या काही तासांनंतर पोलीस ठाणे गाठत आत्मसमर्पण केले. आरोपीने आपल्या कुटुंबासह घर सोडले होते. त्यानंतर कुटुंबाना दुसऱ्या ठिकाणी हलवले. हे प्रकरण शांत झाल्यानंतर जिल्ह्यात शुक्रवारी सकाळपासून इंटरनेट सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे.


आरोपी संकला राम भील हा मृत किशोरी सिंहच्या याच्या शेजारीच राहत होता. बुधवारी संकला राम आपल्या दहा वर्षांच्या नातवासोबत घराबाहेर बसले होते. तेव्हा किशोर सिंह तिथून जात होतो. त्यावेळी रागाच्या भरात त्याने संकला रामच्या नातवाला कानाखाली मारली आणि त्यांना शिव्या देण्यास सुरुवात केली. नातवला केलेली मारहाण आणि शिवागाळ यामुळे संकला रामला राग अनावर झाला होता. त्याने किशोर सिंहला संपवण्याचा निर्णय घेतला. संतापलेल्या संकलारामने बुधवारी रात्री किशोर सिंह याचा भररस्त्यात कुऱ्हाडीने गळा चिरला.


"आरोपी संकला राम भील हा त्याच्या घराजवळील मंदिराच्या बाहेर त्याच्या दुचाकीवर बसला होता. त्याच्या दुचाकीवर कुऱ्हाड होती. त्याने किशोर सिंह यांच्यासमोर वाहन थांबवले आणि त्याच्या मानेवर किमान कुऱ्हाडीने वार केले. जोपर्यंत त्याचा शिरच्छेद केला जात नाही तोपर्यंत संकला राम वार करत होता. किशोर सिंहचा शिरच्छेद केल्यानंतर लगेचच संकला राम त्याचे छाटलेले मुंडके गावकऱ्यांसमोर फेकून तिथून पळ काढला," अशी माहिती जालोरचे पोलीस अधिक्षक किरण कांग यांनी दिली.