Crime News : आजही अनेक लोक जुन्या परंपरांमध्ये इतके जखडलेले आहेत की त्या पूर्ण करण्यासाठी कुणाला मारतानाही ते घाबरत नाहीत. एकीकडे मुलगा-मुलगी हा भेद सरकारला कळत नाही. तर दुसरीकडे याच भेदातून काहीजण दुष्कृत्ये करत आजही समाजात वावरत आहेत. याचा प्रत्यक्ष पुरावा सवाई माधोपूर (Sawai Madhopur) जिल्ह्याला लागून असलेल्या करौली जिल्ह्यातील नादौती पोलीस (Rajasthan Police) ठाण्याच्या परिसरात घडलाय. एका महिलेला मुलगा होऊ न शकल्याने तिचा खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

करौली जिल्ह्यातील सलेमपूर येथील रहिवासी असलेल्या रुपवंती बेरवा हिचा विवाह बाध येथील अरुण कुमार बैरवा याच्याशी फेब्रुवारी 2017 मध्ये मोठ्या अपेक्षेने झाला होता. लग्नानंतर रुपवंतीने एकामागून एक तीन मुलींना जन्म दिला. पण पती आणि सासरच्यांना मुलगा हवा होता. याचमुळे तिचा पती दारूच्या नशेत तिला सतत मारहाण करायचा आणि मुलगा न झाल्याबद्दल टोमणे मारून तिला सोडून जाण्याची धमकी द्यायचा. रुपवंती तिच्या नातलगांना सतत भांडणाची माहिती देत होती. पण रुपवंतीच्या घरच्यांनी सासरच्यांची समजूत काढून वाद मिटवण्याचा अनेकदा प्रयत्न केला होता. पण शेवटी एक दिवस असा आला की रुपवंतीचा तिच्या सासरच्या घरी अचानक मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. रुपवंतीला मृतावस्थेत सवाई माधोपूर जिल्ह्यातील गंगापूर शहरातील रुग्णालयात आणण्यात आले होते. शवविच्छेदनानंतर रुपवंतीचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.


रुपवंतीच्या मृत्यूने तिच्या कुटुंबियांना जबर धक्का बसला आहे.पतीने रुपवंतीचा बाईकवरून पडून मृत्यू झाल्याचे कारण सांगितले आहे. मात्र हे कारण रुपवंतीच्या कुटुंबियांना न पटल्याने त्यांनी रुग्णालयाच्या शवागारासमोर गोंधळ घातला. तसेच पती आणि सासरच्या मंडळींनी रुपवंतीची हत्या केली असून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा असे सांगितले. नडौती पोलीस ठाण्यात पती व सासरच्यांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा सध्या तपास करत आहेत. पण सर्वात मोठा प्रश्न म्हणजे आजच्या आधुनिक युगातही मुलगी आणि मुलगा यात फरक करुन असे प्रकार करण्यापासून लोक मागे हटत नाहीयेत.


"मुलगा होत नसल्याने कुटुंबात अनेकदा भांडणे होत होती. मुलगा झाला नाही तर घरात ठेवणार नाही असे अनेकदा रुपवतीला सांगितलं होतं. बाईकवरुन पडून रुपवतीचा मृत्यू झाल्याचे आम्हाला सांगण्यात आले. बाईकवरुन पडून रुपवतीचा मृत्यू झाला असता तर तिच्यासोबत त्यावेळी तिची वर्षाची मुलगी का नव्हती. रुपवतीला तीन मुली होत्या. पत्नीला सासरी घेऊन जात असताना हा अपघात झाला असे पतीने सांगितले होते, असे मृत महिलेच्या भावाने सांगितले.