Crime News : राजस्थानमधल्या जालोरमध्ये शिक्षकाच्या मारहाणीत एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना (Jalore Student Death Case) ताजी असतानाच आता शिक्षकाच्या गुंडगिरीची आणखी एक घटना समोर आली आहे. शिक्षकाने एका विद्यार्थ्याला इतकी मारहाण केली की यात त्या विद्यार्थ्याचे दात तुटले (Teacher Broke Teeth). याप्रकरणी विद्यार्थ्याच्या पालकांनी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेमकी घटना काय?
राजस्थानमधल्या उदयपूरमधली (Udaypur) ही घटना असून गुरुवारी एका शाळेत हिंदी विषयाचे शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवत होते. नवव्या इयत्तेत शिकवणाऱ्या या  शिक्षकाने 14 वर्षांच्या एका विद्यार्थ्याला प्रश्न विचारला. पण या विद्यार्थ्याला त्या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही. उत्तर न आल्याने शिक्षकाचा पारा चढला. त्याने संतापाच्या भरात विद्यार्थ्याचं डोकं धरून त्याला बेंचवर आपटलं. यात विद्यार्थ्याचे पुढचे दोन दात तुटले. 


विद्यार्थ्याने पालकांना दिली माहिती
शिक्षकाने केलेल्या मारहाणीबाबत विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना सांगितलं. त्यानंतर पालकही संतापले आणि त्यांनी शाळेत धडक मारली. पण शाळेकडून त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. पालकांनी वर्गातील सीसीटीव्हीचं (CCTV) फुटेजही मागितलं, पण शाळेने फुटेज देण्यात नकार देत उडवाउडवीची उत्तरं दिली.


मुलगा बेंचवर बसत असताना त्याचा तोल गेला आणि तो बेंचवप आपटला, त्यामुळे त्याचे दात तुटले असं उत्तर शाळा व्यवस्थापनाकडून देण्यात आलं. त्यामुळे नाईलाजाने पालकाने पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. पोलीस आता याबाबत पुढील तपास करत आहेत.