Farmer Success Story: शेती हा आतबट्ट्याचा धंदा असल्याचं काही जणांचं म्हणणं आहे. असं असताना राजस्थानमधील (Rajastan News) आदिवासी बहुल डूंगरपूर जिल्ह्यातील शेतकऱ्याची यशोगाथा वाचून बघण्याचा दृष्टीकोन बदलेल. धुवाडीया गावात राहणाऱ्या तीन शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला (Bussiness Idea) फाटा देत झेंडूच्या फुलांची शेती करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय त्यांनी सार्थकी लावला आहे. इतकंच काय तर या शेतीतील उत्पन्नातून शेतकरी महिनाकाठी लाखोंची कमाई करत आहे. गुलाबाच्या शेतीपेक्षा झेंडूची शेती फायदेशीर असल्याचं मत या शेतकऱ्यांनी व्यक्त केलं आहे. लग्न असो की धार्मिक कार्य किंवा इतर कार्यक्रमात झेंडुच्या फुलांना मोठी मागणी असल्याने हा निर्णय योग्य ठरला. दुसरीकडे, झेंडुच्या शेती कमी खर्च आणि मेहनतीत होत असल्याचंही त्यांनी सांगितलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धुवाडीया गावात राहणारे कोदर पटेल, कचरु पटेल आणि तेजपाल पटेल हे शेतकरी बंधू एकत्रितपणे झेंडुची शेती करत आहेत. यापूर्वी ते आपल्या शेतीत गहू, तांदूळ आणि मक्याची पारंपरिक पीक घ्यायचे. मात्र जास्त मेहनत आणि अधिकचा खर्च पाहता हातात तुटपूंजी रक्कम यायची. यामुळे आर्थिक घडी विस्कटली होती. त्यानंतर तिन्ही भावांनी पारंपरिक शेतीला फाटा देत नवं पीक घेण्याचं ठरवलं. या दरम्यान त्यांनी फुलांची शेती करण्याच निर्णय घेतला. तसेच झेंडूची शेती करण्याचं ठरवलं.


बातमी वाचा- ITR Refund 2022 : ITR भरून झालाय, आता रिफंड कधी आणि कसा मिळणार, जाणून घ्या एका क्लिकवर


दरमहा लाखोंची कमाई


कोदर, कचरु आणि तेजपाल पटेल यांनी एक एकर जागेत झेंडूची रोपं लावण्याचा निर्णय घेतला. एक एकर शेती तीन भागात विभागली. आता एका शेतीतून दोन दिवसात 100 किलो फुलांचं उत्पन्न निघतं. एका किलोला स्थानिक बाजारात 20 ते 30 रुपये प्रतिकिलो भाव मिळतो. अशात दरमहा 90 हजारांची कमाई तिन्ही भाऊ करत आहेत. शेतकऱ्यांचं यश पाहून गावातील इतर शेतकरीही पारंपरिक शेतीला फाटा देत आता फुलांच्या शेतीकडे वळत आहे. अनेकांनी आपल्या शेतात झेंडूची लावणी केली आहे. मागणी पाहता इतर शेतकऱ्यानाही लाभ होत आहे.