Death Live Video : एका 45 वर्षांच्या शिक्षकाचा एका कार्यक्रमात नाचता-नाचता मृत्यू झाला. मृत शिक्षिकाच्या मोठ्या भावाच्या निवृत्तीचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजन करण्यात आला होता. यानिमित्ताने एका भजनसंध्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमात 45 वर्षांचा शिक्षक नाचत होता. नाचता-नाचता शिक्षक अचानक जमिनीवर कोसळला. पण पडल्यानंतर तो परत उठलाच नाही. जागेवरच त्याचा मृत्यू झाला. नेमकं काय घडलंय हे लोकांना कळेपर्यंत बराच वेळ गेला. शिक्षक काहीच हालचाल करत नसल्याने जवळपास 10 मिनिटांनी लोकांनी त्यांनी सीपीआर दिला. पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता. मृत्यूचा हा लाईव्ह थरार सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेमकी काय आहे घटना
ही घटना राजस्थानमधल्या जयपूर (Jaipur) इथल्या रेणवाल तालुक्यातल्या भैंसलाना गावातील आहे. इथल्या जालबाली बालाजी मंदिरात भजनसंध्येचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 45 वर्षीय शिक्षक मन्नाराम जाखड पैतृक गावातून भैंसलाना इथं आले होते. मन्नाराम यांचे मोठे भाऊ मंगल जाखड हे राजकीय उच्च माध्यमिक शाळेतून शिक्षक म्हणून निवृत्त झाले होते. या निमित्ताने एका सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. यात भजनाचं कार्यक्रमही ठेवण्यात आला होता. कार्यक्रम ऐन रंगात आला असताना मन्नाराम भजनवार नाचण्याासाठी उभे राहिले. 


चार ते पाच भजनांवर ते मनसोक्त नाचले. काही वेळ बसल्यानंतर त्यांनी पुन्हा नाचायला सुरुवात केली.  'इक दिन मर जाऊं ला कानूड़ा, ध्हारी मुस्कान के मारे...'  या भजनावर त्यांनी नर्तकीबरोबर ताल धरला. पण नाचताना अचानक मन्नाराम खाली कोसळले. लोकांना हा नृत्याचाच भाग असल्याचं वाटल्याने सुरुवातीला त्यांच्या जवळ कोणीच गेलं नाही. पण बराच वेळ मन्नाराम काहीच हालचाल करत नसल्याने लोकांना संशय आला. त्यांनी मन्नाराम यांना उठवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काही जणांनी त्यांनी सीपीआरही दिला. पण त्याचा उपयोग झाला नाही. मन्नाराम यांना तात्काळ रुग्णालायत दाखल करण्यात आलं, पण त्याआधीच त्यांना मृत्यू झाला होता. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by purvanchal (@purvanchal51)


मृत मन्नारम हे जोधपूर जिल्ह्यातील जुड गावात राजकीय उच्च प्राथमिक शाळेत सामाजिक विज्ञान विषयाचे शिक्षक होते. मृत्यूच्या काही मिनिटं आधीच त्यांनी पत्नीबरोबरही डान्स केला होता. मन्नाराम यांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.