Crime News : तिसरीमध्ये शिकणाऱ्या दलित मुलाला शाळेमधील पाणी पिण्यासाठी ठेवलेल्या मडक्याला हात लावणं जीवावर बेतलं आहे. मुलाने मडक्याला हात लावल्यामुळे त्याला मुख्याध्यापकाने मारहाण केली. मारहाणीमुळे मुलाला रूग्णालयात दाखल केलं होतं मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना राजस्थानमधील जालोर जिल्ह्यातील सायला उपविभागातील सुराणा गावातील आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेमंक काय आहे प्रकरण? 
सुराणा गावामधील शाळेमध्ये इंद्रकुमार मेघवाल तिसरीमध्ये शिकत होता. इंद्रकुमारने शाळेतील पाणी पिण्याच्या माठाला हात लावला, मात्र यावरून शाळेचे मुख्याध्यापक छैल सिंह यांनी इंद्रकुमारला जातीवाचक शिवीगाळ करत अमानुषपणे मारहाण केली. 


मुलगा घरी आल्यावर त्याचा कान दुखू लागल्यावर इंद्रजीतचे घरचे त्याला घेऊन अनेक रूग्णालयात गेले होते. मात्र त्याची अवस्था आणखीनच गंभीर होत गेली अखेर अहमदाबादमधल्या रूग्णालयामध्ये त्याने उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. याबाबत इंद्रकुमारचे वडील देवराम मेघवाल यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या घटनेमुळे राजस्थानमधील वातावरण तापलं आहे.


राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचं ट्विट-
खासगी शाळेतील शिक्षकाने केलेल्या मारहाणीत विद्यार्थ्याचा मृत्यू ही दुःखद घटना आहे. आरोपी शिक्षकाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एससी/एसटी कायद्याच्या कलमांखाली त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा जलद तपास आणि दोषींना लवकरात लवकर शिक्षा होण्यासाठी ऑफिसर स्कीममध्ये केस घेण्यात आली आहे. 


दरम्यान, राजस्थानमध्ये या घटनेमुळे तणाव खूप वाढला आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जालोरमध्ये 24 तास इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.