जयपूर : मध्य प्रदेश आणि हरियाणा यांच्यानंतर आता राजस्थान सरकारने बलात्कारप्रकरणी कडक पावले उचलले आहे. राजस्थानमधील मुख्यमंत्री वसुंधराराजे शिंदे सरकारने बलात्कार केल्यास फाशीची शिक्षा असणारे कायदा बिल मंजूर केलेय. हे बिल आता राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बारा वर्षांच्या खालील मुलीवर बलात्कार करणाऱ्यास फाशीची शिक्षा देण्याचा कायदा आज शुक्रवारी राजस्थान विधानसभेमध्ये मंजूर करण्यात आलाय. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मध्य प्रदेश हे अशा प्रकारचा कायदा करण्यात आला. गेल्या महिन्यात हरियाणा सरकारच्या विधानसभेमध्येही हा कायदा पास करण्यात आला.


राजस्थानात इंडियन पीनल कोडमध्ये 376 – एए या कलमाची भर टाकण्यात आली आहे. त्यात स्पष्ट केले आहे की, बारा वर्षांपर्यंतच्या महिलेवर बलात्कार केल्यास त्या गुन्हेगाराला मृत्यूदंडाची किंवा किमान १४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात येईल. तुरुंगवासाची शिक्षा, जन्मठेपेपर्यंत म्हणजे व्यक्ती नैसर्गिकरीत्या मरण पावेपर्यंत वाढवता येईल. शिवाय आरोपीला दंडही ठोठावता येईल. 


तसेच सामूहिक बलात्काराच्या गुन्ह्यासाठी 376 – डीडी या कलमाचीही भर टाकण्यात येणार आहे. या विधेयकामागची कारण मीमांसा करताना राज्य सरकारने नमूद केलेय. सगळीकडे बालकांवर बलात्कार आणि सामूहिक बलात्कार करण्याचे प्रमाण वाढत आहे. याला आळा बसला पाहिजे. असे घृणास्पद प्रकार होता कामा नये म्हणून हा कायदा करण्यात आलाय.