मुंबई : देशात 2020 (Rape Cases in India) या वर्षात बलात्काराची सर्वाधिक प्रकरणं राजस्थानमध्ये नोंदवली गेली आहेत. यानंतर या यादीत उत्तर प्रदेशचा दुसरा क्रमांक लागतो. देशभरातील एकूण प्रकरणांपैकी केवळ 30 टक्के बलात्काराची प्रकरणे या दोन राज्यांमध्येच नोंदवली गेली आहेत. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (National Crime Records Bureau) ने जाहीर केलेल्या वर्ष 2020 च्या आकडेवारीवरून ही माहिती मिळाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2020 मध्ये देशभरात बलात्काराच्या एकूण 28 हजार 046 घटनांची नोंद झाली. त्यापैकी एकट्या राजस्थानमध्ये 5,310 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये बलात्काराचे 2,769 गुन्हे नोंदवले गेले आहेत. या दोन राज्यांनंतर मध्य प्रदेश 2,339 प्रकरणांसह तिसऱ्या क्रमांकावर आणि महाराष्ट्र 2,061 प्रकरणांसह चौथ्या स्थानावर आहे.


एनएएसआरबी (NCRB) च्या अहवालानुसार, देशात 18 वर्षांखालील बलात्कार पीडितांची संख्या 2640 इतकी होती, तर 18 वर्षांवरील पीडितांची संख्या 25 हजार 406 होती. यापैकी राजस्थानमध्ये 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या बलात्कार पीडितांची संख्या 1279 इतकी होती. तर 18 वर्षांवरील पीडितांची संख्या 4031 होती. अहवालानुसार, राजस्थानमध्ये बलात्काराच्या अर्ध्याहून अधिक घटनांमध्ये गुन्हेगार कौटुंबिक मित्र, शेजारी, कर्मचारी किंवा इतर ओळखीचे लोक होते.


बलात्काराची सर्वाधिक प्रकरणं असलेली पाच राज्य


राजस्थान - 5310


उत्तर प्रदेश - 2769


मध्य प्रदेश - 2339


महाराष्ट्र - 2061


असम - 1657


बलात्काराची कमी प्रकरणं असलेली पाच राज्य


सिक्किम - 12 केस


नागालैंड - 4 केस


मणिपुर - 32 केस


मिजोरम - 33 केस


गोवा और अरुणाचल प्रदेश - 60 केस


केंद्र शासित प्रदेशांमधील बलात्कार प्रकरणं


दिल्ली - 997 केस


जम्मू-कश्मीर - 243 केस


चंडीगढ़ - 60 केस


पुदुचेरी - 8 केस


दमन दीव - 4 केस


लक्षद्वीप - 3 केस


लडाख - 2 केस


अंदमान-निकोबार - 2 केस


महिलांविरुद्ध सर्वाधिक गुन्हेगारी प्रकरणं असलेल्या यादीत उत्तर प्रदेश अव्वल क्रमांकवर असून 4 हजार 354 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. तर पश्चिम बंगालमध्ये 202 गुन्ह्यांची नोंद झाली आहे.