Shopkeeper Customer Dispute : 5 रुपये किमतीचं लिंबू घेण्यावरून दुकानदार आणि ग्राहक यांच्यातील वाद इतका टोकाला गेला की, दुकानदाराने त्याच्या साथीदारांसह ग्राहकावर गोळ्या झाडल्या. ग्राहकाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याची प्रकृती चिंताजनक असून उपचार सुरु आहेत. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजस्थानमधील भरतपूरच्या डीग पोलीस स्टेशन हद्दीतील बहज गावातील ही घटना आहे. दिनेश नावाचा व्यक्ती संध्याकाळी महेंद्र बच्चू यांच्या दुकानात लिंबू घेण्यासाठी गेला होता. या दुकानातून दिनेशने 100 रुपये देऊन 500 रुपये किमतीचे लिंबू विकत घेतले. खुल्या पैशाच्या मुद्द्यावरून दिनेश आणि महेंद्र यांच्यात बाचाबाची आणि शिवीगाळ झाली. 


या प्रकारावरुन संतापलेल्या दुकानदाराच्या मुलाने रात्रीच्या सुमारास आपल्या साथीदारांसह दिनेश याच्या घरात घुसून त्याच्यावर गोळीबार केला. पीडित कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार दुकानदार महेंद्रचा लहान मुलगा भोलू हा काठ्या आणि रॉड घेऊन घरी आला. घरी आल्यानंतर त्याने तिला शिवीगाळ केली. कुटुंबियांनी दिनेशला घराबाहेर पडू दिलं नाही. त्यामुळे धर्मा उर्फ ​​धर्मेंद्र जाट मुलगा जयवीर नावाच्या गुंडाने घरावर चार गोळ्या झाडल्या. यातली एक गोळी दिनेशला लागली.


जखमी दिनेशला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पीडितेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.