जोधपूर : राजस्थानमधील ट्रक आणि जीप अपघात (Accident in Rajasthan) ११ जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात आज शनिवारी सकाळी ७.३० वाजता राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यातील बालोत्रा-फलोदी महामार्गावर झाला. भीषण रस्ता अपघातात ११ जण ठार आणि तीन गंभीर जखमी झाले आहेत. या अपघानंतर मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भरधार ट्रक चक्क जीपच्यावर चढला. ट्रकचा पुढील भागाचा चक्काचूर झाला असून जीपचा चेंदामेंदा झाला आहे. यावरुन या अपघाताची तीव्रता लक्षात येते. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी ट्विटद्वारे हा अपघात अत्यंत वेदनादायक आहे, असे म्हटले आहे. त्यांनी कुटुंबियांबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. या अपघाताची माहिती मिळाताच आसपासच्या भागातील स्थानिक लोक मदतीला धावले. भीषण अपघातानंतर महामार्गवर एकच गोंधळ उडाला होता.



या भीषण अपघातातील मृतांत चार पुरुष, सहा महिला आणि एका मुलाचा समावेश आहे. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि कारमध्ये अडकलेल्या लोकांचे मृतदेह बाहेर काढले.