नवी दिल्ली : तुम्ही बाहेरगावी जाण्यासाठी ट्रेनचा वापर करता? तर मग ही बातमी खास तुमच्यासाठी आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजधानी आणि शताब्दी ट्रेन्सने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. नियोजित ट्रेनला एक तासापेक्षा अधिक वेळ उशीर झाल्यास त्यासंदर्भात प्रवाशांना रेल्वेतर्फे एसएमएस पाठविण्यात येणार आहे.


सध्यस्थितीत केवळ वेटिंग लिस्टमध्ये असलेल्या प्रवाशांचं तिकिट कन्फर्म झाल्यास त्यांना एसएमएस पाठविण्यात येतो.


या प्रकल्पात सहभागी रेल्वे मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, राजधानी आणि शताब्दी ट्रेन्समध्ये ही एसएमएस सेवा शनिवारपासून सुर करण्यात आली आहे. त्यानंतर टप्प्या टप्प्याने ही सेवा सर्वच ट्रेन्समध्ये सुरु करण्यात येणार आहे.


या सुविधेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना रिझर्व्हेशन स्पिलमध्ये आपला मोबाईल क्रमांक द्यावा लागणार आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी ही सेवा सुरु करण्यात आली आहे. या सेवेसाठी लागणारा खर्च रेल्वेतर्फे करण्यात येणार आहे.


काही दिवसांपूर्वी या सेवीची चाचणी करण्यात आली होती मात्र, त्यावेळी काही समस्या निर्माण झाल्या होत्या. आता या समस्या दूर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ही एसएमएस सेवा राजधानी आणि शताब्दी ट्रेन्समध्ये सुरु करण्यात आली आहे.