रजनीकांतने नदी जोडण्यासाठी दिले १ कोटी, शेतकऱ्यांना होणार फायदा
दक्षिणेतील सुपरस्टार रजनीकांतने पुन्हा एकदा लोकांचं मन जिंकलं आहे. तमिळनाडुची राजधानी चेन्नईमध्ये नॅशनल साऊथ इंडियन नद्यांना इंटर-लिंकिंग करण्साठी किसान एसोचचे प्रमुख पी. अय्याकन्नू यांनी रजनीकांत यांची भेट घेतली. ज्यानंतर रजनीकांतने नद्यांना जोडण्यासाठी १ कोटी रुपये देण्याचं वचन दिलं आहे.
चेन्नई : दक्षिणेतील सुपरस्टार रजनीकांतने पुन्हा एकदा लोकांचं मन जिंकलं आहे. तमिळनाडुची राजधानी चेन्नईमध्ये नॅशनल साऊथ इंडियन नद्यांना इंटर-लिंकिंग करण्साठी किसान एसोचचे प्रमुख पी. अय्याकन्नू यांनी रजनीकांत यांची भेट घेतली. ज्यानंतर रजनीकांतने नद्यांना जोडण्यासाठी १ कोटी रुपये देण्याचं वचन दिलं आहे.
नद्यांना जोडल्यानंतर दक्षिणेतील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. मागील काही दिवसांपासून रजनीकांत हे राजकारणात येतील असे संकेत येत होते. रजनीकांत यांची शेतकऱ्यांना भेट हे देखील राजकारणाशी जोडलं जात आहे. तमिळनाडूमध्ये मागील काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर वातावरण तापलं आहे. तमिळनाडूच्या अनेक भागामध्ये शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागतो.