अभिनेता रजनीकांत यांचा ३१ डिसेंबरला राजकीय प्रवेश
दक्षिण भारतातील राजकारणात आणखी एक टॉलिवूड अभिनेता पाऊल टाकत आहे. हा सुपरस्टार ३१ डिसेंबरला राजकारणात प्रवेश करत आहे. त्याचे नाव आहे रजनीकांत.
चेन्नई : दक्षिण भारतातील राजकारणात आणखी एक टॉलिवूड अभिनेता पाऊल टाकत आहे. हा सुपरस्टार ३१ डिसेंबरला राजकारणात प्रवेश करत आहे. त्याचे नाव आहे रजनीकांत.
थोडा उशीरच झाला...
आपल्या राजकीय प्रवेशाबाबत खुद्द रजनीकांतने म्हटलेय, थोडा उशीरच झाला, पण माझा राजकीय प्रवेशच मोठा विजय आहे. राजकारण हे क्षेत्र माझ्यासाठी नवे नाही, असे सांगत येत्या ३१ डिसेंबरला राजकारणात नव्याने प्रवेश करत आहे.
चाहत्यांशी संवाद
अभिनेता रजनीकांत यांनी चेन्नईत आजपासून आपल्या चाहत्यांशी संवाद साधत आहेत. येथील राघवेंद्र कल्याणा मंडपममध्ये १८ जिल्ह्यांतून हजारो चाहते त्यांच्या भेटीसाठी आलेत.
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार कमल हसन आणि आता आणखी एक सुपरस्टार रजनीकांत राजकारणात प्रवेश करणार अशी अनेक वर्षांपासून चर्चा होती. आता रजनीकांतच्या राजकारणाची चर्चा अधिक रंगणार आहे.
राजकीय उत्सुकतेला पूर्णविराम
काही दिवसांपूर्वी कमल हसन यांनी राजकीय एन्ट्री केल्यानंतर रजनीकांत राजकारणात कधी येणार, याची उत्सुकता होती. आता राजकीय प्रवेशचा मुहूर्त सापडला असून ३१ डिसेंबरला राजकारणात प्रवेश करणार असल्याचे रजनीकांत यांनी चेन्नईत जाहीर केलेय.