Rajiv Gandhi assassination : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्या प्रकरणातील नलिनी श्रीहरन (Nalini Sriharan) आणि इतर चार दोषींची शनिवारी संध्याकाळी 31 वर्षांनंतर तामिळनाडूतील (tamil nadu) तुरुंगातून सुटका करण्यात आली. वेल्लोरमधील महिलांसाठीच्या विशेष तुरुंगातून सुटल्यानंतर लगेचच नलिनी वेल्लोर मध्यवर्ती कारागृहात गेली, जिथून तिचे पती व्ही. श्रीहरन उर्फ ​​मुरुगन यांची सुटका झाली. माजी पंतप्रधान राजीव गांधी हत्या प्रकरणातील सहाही दोषींची सुटका करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने (supreme court) शुक्रवारी दिले होते. (Rajiv Gandhi assassination Nalini Sriharan arrested after police collect photographer camera)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुरुंगातून सुटल्यानंतर नलिनीने गेल्या ३२ वर्षापासून तामिळनाडूच्या लोकांनी मला दिलेल्या पाठिंब्याबद्दल, त्यांची मी आभारी आहे. राज्य आणि केंद्र सरकारचेही धन्यवाद मानते, अशी प्रतिक्रिया दिली.



याआधी पॅरोलवर बाहेर आलेल्या नलिनीने सुटकेसाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. नलिनीने तिच्या याचिकेत 9 सप्टेंबर 2018 पासून तिची तुरुंगवास बेकायदेशीर आहे कारण तामिळनाडू सरकारने तिच्यासह सात दोषींना सोडण्याची शिफारस करणारा मंत्रिमंडळ ठराव मंजूर केला होता. मात्र मद्रास उच्च न्यायालयाने त्यांची याचिका 11 मार्च रोजी फेटाळली, असा युक्तिवाद केला होता.


31 वर्षांपासून तुरुंगात 


या प्रकरणी नलिनी श्रीहरन तुरुंगात सर्वाधिक काळ शिक्षा भोगणाऱ्या महिला कैदी आहेत. ती जवळपास 31 वर्षांपासून तुरुंगात आहे. 14 जून 1991 रोजी नलिनीला अटक करण्यात आली होती. 2016 मध्ये पहिल्यांदा वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी 12 तास तुरुंगाबाहेर आली होती. जुलै 2019 मध्ये त्याला दुसऱ्यांदा तुरुंगातून बाहेर येण्याची संधी मिळाली. त्यानंतर ती मुलगी हरिताच्या लग्नाला हजर राहिली होती. माध्यमांच्या वृत्तानुसार जुलै 2020 मध्ये नलिनीने कारागृहात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांनी या दाव्याचे खंडन करत फक्त आत्महत्येची धमकी दिल्याचे म्हटले होते.


नलिनीला अटक कशी झाली?


राजीव गांधी यांच्या हत्या प्रकरणात सामील होण्यावेळी नलिनीचे वय 24 वर्षे होते. नलिनीने इथिराज कॉलेजमधून इंग्रजी भाषा आणि साहित्यात पदवी घेतली होती. नलिनीची आई पद्मावती परिचारिका आणि वडील पी. शंकर नारायणन हे माजी पोलीस निरीक्षक होते. कुटुंबामध्ये सर्वात मोठी मुलगी होती. नलिनी राजीव गांधींच्या श्रीपेरुंबदुर येथील निवडणूक रॅलीत मुख्य सूत्रधार शिवरासन, धनू  (बॉम्ब लावलेली महिला), सुभा आणि हरिबाबू यांच्यासमवेत होती. या हल्ल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरून एका फोटोग्राफरचा कॅमेरा जप्त केला होता. त्यामध्ये नलिनी, शिवरासन, धनू आणि सुभा यांची फोटो सापडले होते. ज्याच्याबळावर नलिनी आणि इतरांना अटक करण्यात आली.