दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांचा राजकारणात प्रवेश
दक्षिणेतील प्रसिद्ध सुपरस्टार रजनीकांत यांनी अखेर राजकारणात प्रवेश केलाय. चेन्नईत त्यांनी आज ही घोषणा केली.
चेन्नई : दक्षिणेतील प्रसिद्ध सुपरस्टार रजनीकांत यांनी अखेर राजकारणात प्रवेश केलाय. चेन्नईत त्यांनी आज ही घोषणा केली.
यावेळी पुढील विधानसभा निवडणुकीत नवा पक्ष स्थापन करणार आणि सर्व जागा लढवणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा त्यांनी यावेळी केली.
तामिळनाडूमधील लोकशाही सध्या संकटात आहे. इतर राज्ये आपल्या राज्याची खिल्ली उडवत आहेत. मी जर हा निर्णय घेतला नसता तर मला नक्कीच अपराध्यासारखे वाटले असते. म्हणूनच मी राजकारणात येण्याचा निर्णय घेतलाय.
राज्यात मूलभूत बदलांची गरज आहे. लोकशाहीच्या नावावर हे राजकारणी आपल्याला लुबाडत आहेत. मुळापासून बदल व्हायला हवा. सत्य, कार्य आणि विकास हे माझ्या पक्षाचे तीन मंत्र आहेत, असे रजनीकांत यांनी यावेळी सांगितले.