जयपूर : राज्यस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये आज मुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा पार पडत आहे. यातील राज्यस्थानच्या शपथविधी सोहळ्याला सुरूवात होत आहे. राज्यस्थानमध्ये गुड गव्हर्नंस आणणार असून सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्था मजबूत करणार असल्याचे अशोक गहलोत यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याआधी सांगितले. अशोक गहलोत यांची विधानसभा सरदापूरामध्ये सकाळपासून आनंदाचं वातावरण आहे. माजी कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे अशी मान्यवर मंडळी सोहळ्याच्या ठिकाणी पोहोचली आहेत. नागरीक, कार्यकर्ते नवे कपडे घालून नाचताना-गाताना दिसत आहेत. शपथ ग्रहण सोहळ्यात गहलोत परीवाराचे सदस्य देखील उपस्थित आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशोक गहलोत यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर लगेचच सचिन पायलट यांनी उप मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.



भावी उपमुख्यमंत्री देखील जयपूर मधील आपल्या घराबाहेर कार्यकर्त्यांना भेटले. कॉंग्रेस नेता अशोक गहलोत आणि प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांच्यासोबतच कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंह, एच.डी. देवगौडा सहित अनेक दिग्गज नेता यामध्ये सहभागी होत आहेत.


पत्रकारांशी संवाद 



कांग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, एच डी देवेगौड़ा, मल्लिकार्जुन खड़गे, शरद यादव, फारूख अब्दुल्ला, चंद्रबाबू नायडू, समाजवादी पार्टी, तृणमूल कांग्रेस, सीपीआई,सीपीएम, डीएमके, आम आदमी पार्टी, यांच्यासह विरोधी पक्षातील काही नेते मंडळीही याप्रसंगी उपस्थित असतील असे अशोक गहलोत यांनी सांगितले. अल्बर्ट हॉलमध्ये होणाऱ्या भव्य शपथग्रहण सोहळ्याचा आढावा घेण्यासाठी ते आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.