राज्यस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये आज मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी
तीन राज्यांमध्ये नवे मुख्यमंत्री पद आणि गोपनियतेची शपथ घेतील.
नवी दिल्ली : तीन राज्यांच्या विधानसभा निवडणूकीत कॉंग्रेस जिंकल्यानंतर आज राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये नवे सरकार स्थापन होणार आहे. या तीन राज्यांमध्ये नवे मुख्यमंत्री पद आणि गोपनियतेची शपथ घेतील. ठरलेल्या कार्यक्रमानुसार राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि उप मुख्यमंत्री सचिन पायलट शपथ घेतील. यानंतर दुपारी मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री कमलनाथ शपथ घेतील. तर संध्याकाळी छत्तीसगडचे नवे मुख्यमंत्री भूपेश बघेल हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील.
सचिन पायलट उप मुख्यमंत्री
जयपूरच्या ऐतिहासिक अल्बर्ट हॉलवर आज (सोमवारी) सकाळी 10 वाजता शपथ विधी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. अशोक गहलोत आणि सचिन पायलट देखील यावेळी शपथ घेणार आहेत. या सोहळ्यात कॉंग्रेसमधील दिग्गज तर सहभागी असतीलच सोबत दक्षिणेतील महत्त्वाचे राजकारणी चेहरे दिसतील.
कॉंग्रेसतर्फे शपथ विधी सोहळ्यात अध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि मल्लिकार्जून खरगे सहभागी होतील. कर्नाटकमध्येही कॉंग्रेस आणि जेडीएसचे सरकार आल्यावर शपथ विधी सोहळ्यात बंगळूरमध्ये कॉंग्रेसनेही असेच आयोजन केले होते. देशभरातील विरोधी पक्षनेते यावेळी एकत्र आले होते. यावेळच्या सोहळ्यात माजी मुख्यमंत्री एचडी देवगौडा, केंद्रीय मंत्री शरद यादव आणि जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला कार्यक्रमात सहभागी होतील.
'आप'ही सोहळ्यात
गहलोत येथील शपथ विधी सोहळ्यात आम आदमी पक्षाचे नेतेमंडळी देखील सहभागी होतील. आपचे ज्येष्ठ नेते संजय सिंह हे राज्यस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या शपथ विधी सोहळ्यात सहभागी होतील. गहलोत यांनी आपल्याला आमंत्रण दिल्याच्या वृत्ताला संजय सिंह यांनी पुष्टी दिली.
18 वे मुख्यमंत्री
मध्य प्रदेशचे 18 वे मुख्यमंत्री म्हणून कमलनाथ शपथ घेतील. राज्यपाल आनंदीबेन पटेल त्यांना गोपनीयतेची शपथ देतील. भोपाळच्या जम्बूरी मैदानात दुपारी दीड वाजता हा शपथविधी सोहळा पार पडेल. यावेळी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधीं सहित यूपीएचे अनेक दिग्गज नेता उपस्थित असतील.
4 वाजता सोहळा
छत्तीसगडमध्ये संध्याकाळी भूपेश बघेल हे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. संध्याकाळी 4 वाजता हा सोहळा सुरू होणार असून त्यांच्यासोबत इतर कोणतेही मंत्री शपथ घेणार नसल्याचे कॉंग्रेस नेता मल्लिकार्जून खरगे यांनी सांगितले.