`जेट`च्या भोंगळ कारभाराचा राजू शेट्टींना फटका!
मुंबईहून दिल्लीला निघालेल्या खासदार राजू शेट्टींना आज जेट एअरवेजच्या अनागोंदी कारभाराचा जबर फटका बसला.
मुंबई : मुंबईहून दिल्लीला निघालेल्या खासदार राजू शेट्टींना आज जेट एअरवेजच्या अनागोंदी कारभाराचा जबर फटका बसला.
सकाळी सहाच्या विमानासाठी राजू शेट्टी सकाळी पाच वाजताच विमानतळावर आले. त्यांनी विमानाचा बोर्डिंग पासही घेतला. त्यानंतर विमानतळारच्या लाऊंजमध्ये जाऊन बसले.
त्यानंतर पावणेसहा झाले, तरी बोर्डिंग अनाऊसमेंट होत नाही असे लक्षात आल्यावर त्यांनी जेटच्या ग्राऊंड स्टाफकडे विचारणा केली. विमानाचे दरवाजे बंद झाल्याचं त्यांनी सांगितलं.
शेट्टींना आज तातडीनं दिल्लीला जाणं भाग असल्यानं त्यांनी मागच्या विमानात अतिरिक्त २००० रुपये देऊन दिल्ली गाठली. पण जेट एअरवेजनं त्याची पावतीही नाकारल्याचा शेट्टींचा आरोप आहे. याविषयी केंद्रीय नागरी विमान मंत्रालयाकडे तक्रार करणार असल्याचं शेट्टींनी 'झी २४ तास'शी बोलताना म्हटलंय.