Raju Shrivastav Health Update : राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती
स्टार कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Shrivastav Health Update) जवळपास 2 आठवड्यांपासून जीवन-मृत्यूशी झुंज देतायेत.
नवी दिल्ली : स्टार कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Shrivastav Health Update) जवळपास 2 आठवड्यांपासून जीवन-मृत्यूशी झुंज देतायेत. राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबाबत मोठी माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं गेलंय. मात्र त्यानंतरही राजू श्रीवास्तव शुद्धीवर आलेले नाहीत. वैद्यकीय पथक 24 तास त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत. तसेच श्रीवास्तव यांचे कुटुंबियही रुग्णालयात उपस्थित आहेत. (raju shrivastav health update senior comedian admited in aiims hospital know his health stable or not)
राजू यांची प्रकृती स्थिर
राजू श्रीवास्तव यांची प्रकृतीत बऱ्याच दिवसांपासून सुधारणा नव्हती. मात्र त्यांच्या प्रकृतीबाबत सातत्याने माहिती समोर येतेयय. नुकतीच अभिनेता शेखर सुमन यांनी राजू यांच्या प्रकृतीबद्दल कुटुंबियांशी संवाद साधल्यानंतर माहिती दिली. "आजची राजू यांच्या प्रकृतीबाबत कुटुंबियांनी दिलेली माहिती. राजू यांचे अवयव हालचाल करतायेत. मात्र ते सध्या बेशुद्धच आहेत. डॉक्टरांनुसार त्यांच्या तब्येतीत सातत्याने सुधारणा होतेय. महादेवाची कृपा, हर हर महादेव"
राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आल्याने दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. राजू यांचे चाहते त्यांच्यासाठी प्रार्थना करतायेत. राजू श्रीवास्तव यांचा भाऊ दीपू श्रीवास्तवने सोशल मीडियाद्वारे व्हीडिओ शेअर करून माहिती दिली की, ते बरे होत आहेत आणि डॉक्टरांची एक विशेष टीम त्यांची सतत काळजी घेत आहे.