नवी दिल्ली : राज्यसभेच्या १८ जागांसाठी निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केली आहे. राज्यसभेच्या १८ जागांवर १९ जून रोजी मतदान होणार आहे. कोरोना संकटामुळे २६ मार्च रोजी होणारी राज्यसभा निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला होता. निवडणूक पुढे ढकलण्याच्या सूचना विविध राजकीय पक्षांच्या वतीने निवडणूक आयोगास करण्यात आल्या होत्या.


या राज्यांच्या जागांवर निवडणूक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यसभेच्या १८ जागांपैकी गुजरात आणि आंध्र प्रदेशात प्रत्येकी चार, राजस्थान आणि मध्य प्रदेशात प्रत्येकी तीन, झारखंडमधील दोन आणि मणिपूर आणि मेघालयातील प्रत्येकी एक जागेचा समावेश आहे.


अलिकडे राज्यसभेचे अध्यक्ष व्यकैय्या नायडू यांनी वेगवेगळ्या मंत्रालयांचा समावेश असलेल्या संसदीय समितीच्या सदस्यांसोबत पुढील रननीतीवर चर्चा केली.