मुंबई :  Firstsource Solutions Limited एक बिझनेस प्रोसेस मॅनेजमेन्ट कंपनी आहे. या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना फार कमी कालावधीत मालामाल केलं आहे. बिग बुल राजेश झुनझुनवाला यांच्याकडे देखील याचं कंपनीचे शेअर असतात. गेल्या वर्षी ज्यांनी 8 जुलै 2020 रोजी  Firstsource Solutions कंपनीच्या एक शेअरची किंमत 389 रूपये होती. आज कंपनीच्या एका शेअरची किंमत 197.90 रूपये आहे. म्हणजे या शेअरने आतापर्यंत त्यांच्या ग्राहकांना 405 टक्के रिटर्न दिलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जर तुम्ही एक वर्षापुर्वी Firstsource Solutions कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रूपये गुंतवले असते तर आज त्या 1 लाख रूपयांचे 5 लाख रूपये झाले असते.  त्याचप्रमाणे जर तुम्ही 5 लाख रूपये कंपनीच्या शेअरमध्ये  गुंतवले असते, तर तुम्हाला त्या 5 लाख रूपयांचे 25.37 लाख मिळाले असते. 


म्हणजे तुमचे पैसे एका वर्षांत 5 पटीने वाढले असते. कंपनीने सलग चार तिमाहींसाठी चांगले परिणाम दिले आहेत. Firstsource Solutionsने  मार्च 2021 पर्यंत 46.68 कोटी रूपयांचा नफा नोंदविला आहे. तर वर्षभरापूर्वी याच तिमाहीत कंपनीचा नफा 91.58 कोटी रुपये झाला आहे.


दरम्यान, बिग बुल राकेश झुंझुनवालाने यांनी कंपनीमधील आपला हिस्सा कमी केला आहे. झुंझुनवाला यांचे डिसेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीत 1.29 टक्के शेअर्स किंवा कंपनीचे 90 लाख शेअर्स होते. तर 30 सप्टेंबर 2020 पर्यंत कंपनीचे 2.88 टक्के शेअर्स किंवा 2 कोटी शेअर्स होते.