मुंबई : राकेश झुनझूनवाला यांची गुंतवणूक असलेल्या Tata Motors च्या शेअरमध्ये घसरण दिसून येत आहे. Tata Motorsला जूनच्या तिमाहीमध्ये 4451 कोटी रुपयांचा मोठा तोटा झाला आहे. एका वर्षापूर्वीच्या तिमाहीच्या तुलनेत हा तोटा 50 टक्के कमी झाला आहे. आर्थिक वर्ष 2021 च्या जून तिमाहीमध्ये कंपनीला 8438 कोटीचा तोटा झाला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही तज्ज्ञांच्या मते, लॉकडाऊनमुळे मालाचा पुरेसा पुरवठा होत नव्हता. त्यामुळे हे निकाल अपेक्षित होते. परंतु  कंपनीचे इतर व्यवसाय सुरळीत सुरू आहेत. त्यामुळे हा तोटा कमी कालावधीसाठी आहे. 
बाजारातील बिग बुल राकेश झुनझूनवाला यांची देखील Tata Motorsमध्ये गुंतवणूक आहे. त्यांच्याकडे कंपनीचे 3,77,50,000 शेअर आहेत. दरम्यान झुनझूनवाला यांनी Tata Motors मोटर्समधून आपली भागीदारी 0.2 टक्क्यांनी कमी केली आहे.


Tata Motors च्या शेअर्सची सध्याची स्थिती काहीही असली तरी अनेक दिग्गजांनी  या शेअरवर विश्वास दाखवला आहे.2022 पर्यंत कंपनीची अर्निंग पॉझिटिव्ह येण्याची शक्यता आहे. दिग्गज ब्रोकरेज हाऊसेस या शेअरमध्ये खरेदीचा सल्ला दिला आहे. तसेच यासाठी 400 रुपयांचे लक्ष ठेवले आहे.