Share Price : राकेश झुनझुनवाला हे शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार आहेत. किरकोळ गुंतवणूकदार नेहमीच त्यांचा पोर्टफोलिओ फॉलो करतात. तर राकेश झुनझुनवाला यांना एका स्टॉकने कोट्यवधींचा परतावा दिला आहे. आज हा स्टॉक मल्टीबॅगरच्या श्रेणीत समाविष्ट झाला आहे. तर या स्टॉकने गुंतवणूकदारांना उत्कृष्ट परतावाही दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या शेअर्सचे भाव आज गगनाला भिडले आहेत. त्याचबरोबर शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत, ज्यांनी कमी कालावधीत गुंतवणूकदारांना चांगला नफा मिळवून दिला आहे. यामध्ये राकेश झुनझुनवाला यांनी खरेदी केलेल्या शेअर्सचा समावेश आहे.


टायटन कंपनीचे शेअर


टायटन कंपनीच्या शेअरने अल्पावधीतच गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. दुसरीकडे वर्ष 2009 मध्ये एका वेळी टायटनचा स्टॉक 40 रुपयांपेक्षा कमी किंमतीला मिळत होता.


13 मार्च 2009 रोजी टायटनचा शेअर 36.04 रुपयांवर होता. मात्र, आता या शेअरची किंमत 2000 रुपयांच्या पुढे गेली आहे. तसेच, टायटनच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्च आणि सर्वकालीन उच्च किंमत रु. 2768 आहे. सध्या टायटनच्या शेअरची किंमत 3 ऑगस्ट 2022 रोजी 2365 रुपयांच्या आसपास आहे. टायटनची 52 आठवड्यांची नीचांकी किंमत 1763.20 रुपये आहे.