Rakshabandhan 2021 : भारतीय रेल्वे कायमच सण- उत्सवांच्या निमित्तानं प्रवाशांसाठी काही खास सवलती देत असते. आताही रेल्वेकडून रक्षाबंधनच्या (rakshabandhan) निमित्तानं खास महिला वर्गासाठी मोठं गिफ्ट देण्यात आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सहसा रक्षाबंधनच्या दिवशी राखी बांधली असता भाऊ बहिणीला ओवाळणी देतो. पण, इथं  (railway) रेल्वेनंच समस्त महिलांना खास आणि अनोखं गिफ्ट दिलं आहे. (IRCTC) कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार (Tejas Express Train ) तेजस एक्सप्रेस ट्रेननं रक्षाबंधनच्या दिवशी प्रवास करणाऱ्या महिलांना कॅशबॅक सवलतीचा लाभ घेता येणार आहे. दिल्ली ते लखनऊ आणि मुंबई ते अहमदाबाद या दोन मार्गांवरुन प्रवास करणाऱ्या महिलांना ही सूट मिळणार आहे.


वर नमूद करण्यात आलेल्या दोन मार्गांनी प्रवास करणाऱ्या महिलांना रेल्वे तिकिट दराच्या तुलनेत 5 टक्के कॅशबॅक देण्यात येणार आहे. ही सवलत फक्त रक्षाबंधनपुरताच म्हणजेच 24 ऑगस्टपुरताच सीमीत असेल. यावेळी एकाच वेळी अनेक तिकीटांचं आरक्षण करता येणार आहे.


तिकीटाचं आरक्षण अथवा तिकीट बुक करतेवेळी त्याच क्षणी कॅशबॅक देण्यात येईल, यासाठी कोणतीही दिरंगाई रेल्वे मंत्रालयाकडून करण्यात येणार नाही. या घोषणेपूर्वीच तिकीट काढलेल्या महिलांनाही चिंता करण्याची कारणनाही, कारण त्यांनाही या खास सवलतीचा लाभ मिळणार आहे.   


कोरोनाच्या संकटामुळं लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर आता तेजस एक्सप्रेस पुन्हा एकदा रुळावर आली असून, प्रवाशांसाठी खास सवलतीही घेऊन आली आहे.