Raksha Bandhan Bank Holiday: यावर्षी 19 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनचा सण साजरा केला जाईल. या दिवशी शाळांना, कार्यालयांना सुट्टी असते. अशावेळी अनेकांना बॅंकांची कामे करायची असतात. पण रक्षाबंधनच्या दिवशी बँक हॉलीडे आहे की नाही? हे अनेकांना माहिती नाहीय. कोणत्या राज्यात बँकांना सुट्टी आहे? कोणत्या राज्यात नाही? याबद्दल अनेकांच्या मनात गोंधळ आहे. त्यामुळे याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 


मोठ्या सणांपैकी एक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिंदू धर्मातील मोठ्या सणांपैकी एक असलेला रक्षा बंधन सण उत्साहात साजरा केला जातो.  भावा बहिणीच्या पवित्र नात्याचा सण देशभरात साजरा होतो. दरवर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते. भावाच्या दीर्घायुष्य,सुख,शांती,समाधानासाठी प्रार्थना करते. तर भाऊ आपल्या बहिणीला आयुष्यभर रक्षा करण्याचे वचन देतो.यावेळी भाऊ बहिणीला गिफ्ट देखील देतो.रक्षाबंधनच्या दिवशी सर्वच राज्यातील बँक बंद नसतील. कारण ही एक गॅजेटेड सुट्टी नाहीय तर रजिस्टर सुट्टी आहे. त्यामुळे काही राज्यांमध्ये रक्षाबंधनच्या दिवशी बॅंक सुरु राहतील. 


रक्षाबंधनला या राज्यात बॅंक राहणार सुरु 


रक्षाबंधनच्या दिवशी झूलना पौर्णमा आणि वीर विक्रम किशोर माणिक्य बहादूर यांचा जन्मदिवस आहे. त्रिुपुरा, गुजरात, ओडिशा, उत्तराखंड, राजस्थान, ओडिशा, उत्तराखंड, राजस्थान, उत्तर प्रदेश और हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये रक्षाबंधनच्या दिवशी बॅंक बंद राहतील.त्यामुळे अगरतळा, अहमदाबाद, भुवनेश्वर,देहरादून, जयपूर, कानपूर, लखनौ आणि शिमला या शहरांमध्ये बॅंक बंद राहतील. तर देशातील इतर भागात बँकांचे कामकाज नियमित सुरु राहणार आहे.


ऑगस्ट महिन्यातल्या राहिलेल्या सुट्ट्या 


18 ऑगस्टला रविवारची सुट्टी आहे. 19 ऑगस्टला रक्षाबंधनची सुट्टी, 20 ऑगस्टला श्री नारायण गुरु जयंती, 25 ऑगस्टला रविवारची सुट्टी, 26 ऑगस्टला जन्माष्टमी तर 31 ऑगस्टला चौथ्या शनिवारची सुट्टी असेल. 


बँका बंद असल्या तरी कामे नाही अडणार 


बँक ही महत्वाची अर्थ संस्था आहे. कॅश काढणे, पैसे एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पाठवणे, चेक जमा करणे यासाठी आपल्याला बॅंकेत जावे लागते. पण बदललेल्या तंत्रज्ञानामुळे अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. तुम्ही एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे पाठवण्यासाठी नेट बॅंकींग किंवा मोबाईल बँकींगचा उपयोग करु शकता. कॅश ट्रान्झाक्शनसाठी एटीएमचा वापर करु शकता.