नवी दिल्ली : अयोध्येमध्ये ५ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठीची तयारी सध्या जोरात सुरू आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही अयोध्येमध्ये जाऊन कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अयोध्या दौरा कसा, असणार याचा रोडमॅपही तयार झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत पोहोचल्यावर सगळ्यात आधी हनुमानगढी मंदिरात जाऊत हनुमानाचं दर्शन घेतील. रामलल्लाच्या कामाआधी हनुमानाची परवानगी घेण्याची परंपरा अयोध्येत आहे. 


हनुमानगढीनंतर पंतप्रधान राम जन्मभूमी परिसरात जातील आणि रामलल्लाचं दर्शन घेतील. रामलल्लाचं दर्शन घेतल्यानंतर पंतप्रधान राम मंदिराचं भूमिपूजन करतील. रामलल्लाच्या गर्भगृहामध्ये मंदिराचं भूमिपूजन होईल.


राम मंदिराचं भूमिपूजन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करतील. राम मंदिर निर्माणावर पंतप्रधान अयोध्येतून ऐतिहासिक भाषण करतील. याचबरोबर मोदी राम जन्मभूमी परिसरातून अयोध्येच्या विकासासाठीच्या योजनांचं लोकार्पण आणि शिलान्यास करतील. 


शिलान्यास केल्यानंतर पंतप्रधान काही वेळ राम जन्मभूमी परिसरात घालवतील. यावेळी ते काही प्रमुख साधू-संतांचीही भेट घेणार आहेत.