Ram Navami Wishes in Marathi: आजकाल सोशल मीडियाचा जमाना आहे. त्यामुळे प्रत्येक उत्साह, सण असला की आपल्या प्रियजनांना शुभेच्छा सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरून दिल्या जातात. हिंदू पंचांगानुसार चैत्र नवरात्री उत्सवानंतर नवव्या दिवशी रामनवमी (Ram Navami 2023)गुरुवारी  30 मार्च 2023 ला (#JaiShreeRam) देशभरात साजरी केली जाणार आहे. मग अशावेळी खास मराठीतून आपल्या प्रियजनांना शुभेच्छा द्या...(Ram Navami in Shirdi)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रामनवमी निमित्त विविध संदेश, Wishes, Greetings, Whatsapp Stickers, Images तुम्ही शेअर करुन रामनवमीचा उत्साह साजरा करु शकता. (happy ram navami)


श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश (Ram Navami Wishes In Marathi)


राम ज्यांचे नाव आहे, अयोध्या ज्यांचे गाव आहे.. असा हा रघुनंदन आम्हास सदैव वंदनीय आहे. श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!


दशरथ नंदन राम, दया सागर राम, रघुकुल तिलक राम, सत्यधर्म पारायण राम, श्रीरामनवमीच्या शुभेच्छा!


श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव.. श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!



 


एक बाणी, एक वचनी, मर्यादा पुरुषोत्तम असे आहेत आमचे प्रभू श्री राम, रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा!


दुर्जनांचा नाश करुन कुशल प्रशासनाचा आदर्श प्रस्थापित करणारे मर्यादा पुरुषोत्तम, श्री रामचंद्र यांना वंदन, श्री रामनवमीच्या शुभेच्छा! 


प्रभू रामाला जीवनाचे परम सत्य माना आणि आयुष्यात पुढे जा.. आनंदच मिळेल. रामनवमीच्या शुभेच्छा!



 


श्री राम जय जय राम!


संसारसंगे बहु शीणलों मी । कृपा करी रे रघुराजस्वामी ।प्रारब्ध माझे सहसा टळेना । तुजवीण रामा मज कंठवेना, श्रीराम नवमीच्या शुभेच्छा!


श्री राम राम रामेति । रमे रामे मनोरमे राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!


एक ही नारा एकही नाम प्रभू हमारा श्रीराम, राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!


चैत्र मात्र त्यात शुद्ध नवमी ही तिथी गंथयुक्त तरिही , वात उष्ण हे किती दोन प्रहरी, का ग शिरी सूर्य थांबला, राम जन्मला ग सखे राम जन्मला



 


खास मराठीतून शुभेच्छा!


चरित रघुनाथस्य, शतकोटी प्रविस्तरम, एकैकं अक्षरं पुसां, महापातकनाशकम, श्री राम नवमीच्या शुभेच्छा!


गुणवान तुम्ही, बलवान तुम्ही, भक्तांना देता वरदान तुम्ही, कठीण प्रसंगी मार्ग दाखवता तुम्ही.. जय श्री राम 


राम नावाचा अर्थ जो जाणत नाही तो या जगातील सगळ्यात मोठा अज्ञानी, ज्याच्या मनात राम नाही तो सगळ्यात मोठा दुर्भागी… राम नवमीच्या शुभेच्छा!


श्री रामचंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजसयोग मुद्रा, श्री राम नवमीच्या शुभेच्छा!



ज्यांच्या मनात श्रीराम आहे, त्यांच्या नशिबात वैकुंठधाम आहे. राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!


रघुपती राघव राजाराम पतित पावन सिताराम.. राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा! 


मुकुट शिरावर कटि पीतांबर, वीर वेष तो श्याम मनोहर, सवे जानकी सेवातत्पर मेघ:शामा हे श्रीरामा..  राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!


रामनवमीच्या द्या खास मराठीतून शुभेच्छा!


राम नाम जपत राहा चांगले काम करत राहा, राम नवमीच्या शुभेच्छा!


रामाचा आदर्श घेऊन करा आयुष्याची सुरुवात नेहमीच मिळेल आनंद आणि आयुष्यात होईल भरभराट, राम नवमीच्या शुभेच्छा


पायो जी मैने राम रतन धन पायो… राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!