चंदीगड : डेरा सच्चा सौदाच्या गुरमीत राम रहीम याची तुरुंगात गेल्यानंतरही गुर्मी कायमच असल्याचं दिसतंय. डेराच्या 'कुर्बानी विंग'कडून गुरमीत विरोधात बोलणाऱ्या पत्रकार आणि पोलिसांना धमक्या येत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मीडियासमोर डेरा सच्चा सौदाच्या विरोधात बोलणारे एकेकाळचे अनुयायी आणि पत्रकारांसोबतच हरियाणाच्या तीन पोलीस अधिकाऱ्यांना 'कुर्बानी विंग'कडून जीवे मारण्याच्या धमक्यांचे पत्र पाठवण्यात आलंय. 


गुरमीत राम रहीमसाठी 'कुर्बानी विंग'चे जवळपास २०० तरुण मरण्यासाठी तयार आहेत... परंतु, यामुळे काहीच साध्य होणार नाही म्हणून ते डेरा आणि गुरमीतला बदनाम करणाऱ्या लोकांच्या कुटुंबांना ठार मारण्यासाठी तयार आहेत, असं या पत्रांत म्हटलंय.