१०५ किलोच्या राम रहिमचं वजन इतकं घटलं
साध्वींवर बलात्काराच्या आरोपाखाली शिक्षा भोगत असलेला राम रहिमचं जेलमध्ये चांगलंच वजन कमी झालं आहे.
नवी दिल्ली : साध्वींवर बलात्काराच्या आरोपाखाली शिक्षा भोगत असलेला राम रहिमचं जेलमध्ये चांगलंच वजन कमी झालं आहे.
१०५ किलो होतं वजन
जेलमध्ये जाण्यापूर्वी राम रहिमचं वजन १०५ किलो होतो. राम रहिमचं वजन रोज १२० ग्रॅमने घटत आहे. याचा खुलाचा वैद्यकीय तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी केला आहे. डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहिम हा २ साध्वींवर बलात्काराच्या आरोपाखाली शिक्षा भोगत आहे.
तुरुंगात भोगतोय शिक्षा
सीबीआय न्यायालयाने २५ ऑगस्टला दोषी ठरल्यानंतर राम रहिमला तुरुंगात टाकण्यात आलं होतं. राम रहिमला २० वर्षाची शिक्षा सुनावली आहे. दोन साध्वींवर बलात्कार प्रकरणात १० - १० अशी २० वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. कोर्टाने राम रहिमला दोषी ठरवल्यानंतर मोठ्या प्रमाणात त्याच्या समर्थकाने हिंसा केली होती.
आरोग्य झालं चांंगलं
तुरुंगात काम करणे आणि खाण्याच्या सवयींमुळे त्याचं वजन कमी होत आहे. डॉक्टरांच्या मते, तुरुंगाची नियमितता त्याच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. त्याच्या रक्तातील शुगर आणि ब्लड प्रेशर आता सामान्य आहे.