नवी दिल्ली : बलात्कार प्रकरणात २० वर्षांची शिक्षा झालेल्या गुरमीत राम रहीम याला आता आणखीन एक झटका बसला आहे. राम रहीमचे ट्विटर अकाऊंट्स ट्विटरने बंद केले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शुक्रवारी राम रहीम आणि डेरा सच्चा सौदाचे एकूण चार ट्विटर अकाऊंट्स बंद करण्यात आले. गुरमित राम रहिमचे ट्विटर अकाऊंट भारतापुरतेच बंद करण्यात आले आहे.


ट्विटरने जे अकाऊंट्स बंद केले आहेत त्यामध्ये @Gurmeetramrahim, @derasachasauda, @OfficialMSG_2 आणि  @RamRahimInsan या अकाऊंट्सचा समावेश आहे. राम रहीमचे हे अकाऊंट्स वेरिफाइड होते.


गुरमीत राम रहीम याचे ट्विटरवर जवळपास ३६ लाख फॉलोअर्स आहेत. राम रहीम हा ट्विटर खूप अॅक्टिव्हही होता. आता त्याच्या ट्विटर अकाऊंटवर गेल्यास '@Gurmeetramrahim‘s account has been withheld in: India असा मेसेज येतो.