नवी दिल्ली : शिया वक्फ बोर्डाने राम मंदिर आणि बाबरी मस्जिद वादावर नवा फॉर्म्यूला सादर केला आहे. अयोध्या वादावर तोडगा काढण्यासाठी हा फॉर्म्यूला शिया वक्फ बोर्डचे अध्यक्ष वसीम रिजवी यांनी तयार केला आहे.


अयोध्येमध्ये राम मंदिर बनवा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिया वक्फ बोर्डाने म्हटलं आहे की, ' मस्जिद अयोध्यामध्ये नाही बनवली गेली पाहिजे. तर लखनऊमध्ये बनवली पाहिजे. यासाठी लखनऊमधील हुसैनाबादमधील घंटा घराच्या समोरची शिया वक्फ बोर्डाच्या जमिनीचा प्रस्ताव आहे.


मस्जिदला मुस्लीम राजाचं नाव नको


या मस्जिदचं नाव कोणत्याही मुस्लीम राजाच्या नावावर न ठेवता "मस्जिद-ए-अमन" असं ठेवलं जावं. विवादित जागेवर भगवान श्रीराम यांचं मंदिर बनवावं. ज्यामुळे हिंदू आणि मुस्लीम यांच्यातील वाद नेहमीसाठी संपून जावा. देशात यामुळे शांती कायम राहावी.