दारुची होम डिलीव्हरी करण्याचा `या` राज्याचा निर्णय, मोबाईल एपवरुन करा ऑर्डर
राज्यातील सर्व जिल्ह्यांत दारूची होम डिलीव्हरी
रायपूर : कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेमुळे अनेक राज्यांमध्ये लॉकडाउन सुरू आहे. यामुळे व्यवसाय आणि इतर सेवा थांबल्या आहेत. छत्तीसगड (Chhattisgarh) मध्ये देखील हीच परिस्थिती आहे, 15 आणि 17 मे पर्यंत इथल्या अनेक जिल्ह्यात लॉकडाउन असणार आहे. यावेळी मद्यपान करणार्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. त्यांना अडचणी येऊ नयेत म्हणून राज्यातील सर्व जिल्ह्यांत दारूची होम डिलीव्हरी (Home delivery) केली जाणार आहे.
दारुची घरपोच डिलीव्हरी देण्याचे आदेश उत्पादन शुल्क विभागाने दिले आहेत. त्याअंतर्गत ही सुविधा 10 मेपासून सुरू होणार आहे. दारूची होम डिलीव्हरी सकाळी 9 ते सायंकाळी 8 या वेळेत केली जाणार आहे. त्याचबरोबर छत्तीसगड राज्य विपणन महामंडळाने घरपोच दारू देण्यासाठी दुकाने निश्चित केली आहेत.
दारूची होम डिलीव्हरी बुक करण्यासाठीही अॅप देखील तयार करण्यात आले आहे. सीएसएमसीएल (csmcl) नावाच्या या एपमधून दारु बुक करता येणार आहे. यासाठी ग्राहकांना त्यांचा मोबाईल नंबर, आधार कार्ड, पूर्ण पत्ता नोंदवावा लागेल. ऑनलाइन मद्य ऑर्डर करताना, मद्याचे नाव आणि त्याचे दर अॅपवर दिसतील. या सेवेअंतर्गत मद्य दुकानातून 15 कि.मी. अंतरावर दारू मागविली जाऊ शकते. यासाठी ग्राहकांना आधी ऑनलाईन पेमेंट करावे लागेल. आणि त्यानंतर 100 रुपयांपर्यंत डिलिव्हरी शुल्क भरावे लागेल.
'औषध नाही परंतु दारू घरी'
माजी मुख्यमंत्री रमन सिंह (Raman singh) यांनी छत्तीसगड सरकारवर दारूची होम डिलीव्हरी केल्याबद्दल निशाणा साधला आहे. त्यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, 'कोरोना संकटात दारूची घरपोच डिलीव्हरी करणारे हे देशातील पहिले सरकार आहे. रेशन, औषध आणि लस आपल्या घरात पोहोचू शकेल का माहिती नाही. दारु निश्चित घरी पोहोचते. याचा विचार करा! रूग्णालयात रुग्ण मरत आहेत, पण हे सरकार केवळ मद्यपान करणार्यांची चिंता करीत आहे असा आरोप त्यांनी केला.